आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमेरमुळे रोहित शर्मा जखमी, डाव्या पायाचा अंगठा दुखावला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मीरपूर - भारताचा सलामीवीर रोहित शर्मा शनिवारी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत पाकविरुद्ध सामन्यात मो. अामेरच्या गोलंदाजीवर जखमी झाला. आमेरच्या गोलंदाजीवर रोहितच्या डाव्या पायाचा अंगठा दुखावला आहे. त्याच्या अंगठ्याचे एक्स-रे करण्यात आले असून आशिया चषकातील पुढच्या सामन्यांत त्याचा सहभाग संदिग्ध दिसत आहे.
पाकच्या ८४ धावांचा पाठलाग करताना रोहितच्या डाव्या पायाला आमेरचा पहिला चेेंडू लागला. यावर रोहित जखमी झाला. आमेरच्या पुढच्या फुललेंथ इनस्विंगर चेंडूवर रोहित पायचीत झाला. भारताचा पुढचा सामना मंगळवारी श्रीलंकेविरुद्ध होणार असून या लढतीत रोहितचा सहभाग संदिग्ध दिसत आहे. अंगठ्याला दुखापत झाल्याने रोहित चांगलाच त्रस्त आहे. त्याची दुखापत किती गंभीर आहे आणि त्याला तंदुरुस्त हाेण्यास किती वेळ लागेल हे अजून स्पष्ट झालेले नाही. त्याच्या अंगठ्यावर सूज आहे.
कोहली, युवी परिस्थितीनुसार खेळले : धोनी
कोहलीच्या प्रदर्शनात सातत्य आहे आणि तो टीम इंडियाला शानदार योगदान देत आहे. तो अतिरिक्त जबाबदारी घेण्यास नेहमी तयार असतो. तो चांगली कामगिरी करतो. प्रत्येकी वेळी आपण त्याची कोणाशी तरी तुलना करणे गरजेचे नाही. युवराजनेही चांगली कामगिरी केली. मी वैयक्तिकरीत्या कोणाचीही तुलना करण्यावर विश्वास ठेवत नाही. दोन्ही खेळाडूंनी परिस्थितीनुरूप खेळ केला, असे मत टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने व्यक्त केले. धोनीने गोलंदाजांची स्तुती केली. तो म्हणाला, "गोलंदाजांनी सामना खेचून आणला. या स्पर्धेत गोलंदाजांचे वर्चस्व राहिले, असे दिसते. क्षेत्ररक्षणही सुधारले. एक धावबादसुद्धा सामन्याचे चित्र बदलू शकते.'
कोहलीला दंड
पाकविरुद्ध सामन्यात पंचांच्या निर्णयाविरुद्ध नाराजी व्यक्त केल्याने विराट कोहलीला दंड करण्यात आला. कोहलीने अायसीसीचा नियम लेव्हल-१ भंग केला आहे. यामुळे त्याच्यावर सामनेनिधीतून ३० टक्के रक्कम कपातीचा दंड लावण्यात आला. कोहली आयसीसीची आचारसंहिता २.१.५ नुसार दोषी आढळला. कोहली ४९ धावांवर असताना तो पायचीत झाला. यानंतर पंचांच्या निर्णयावर त्याने नाराजी व्यक्त केली होती.
मो. आमेरने आता केवळ खेळावर लक्ष द्यावे : वकार
"फिक्सिंगमध्ये दोषी आढळल्यानंतर मागच्या पाच वर्षांत त्याने जे काही भोगले, ती त्याने स्वत: केलेली चूक होती. त्याने शानदार पुनरागमन केले आहे. आता त्याने आपले पूर्ण लक्ष खेळण्यावर दिले पाहिजे, असे पाकचे कोच वकार म्हणाले.
वर्ल्डकपसाठी भारत प्रबळ दावेदार : स्टीव्हन स्मिथ
अागामी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत आमची टीम विजयाच्या लक्ष्यानेच मैदानावर खेळेल. मात्र, मला यजमान भारताची स्थिती खूप मजबूत दिसत आहे. भारतच टी-२० जेतेपदासाठी प्रबळ दावेदार दिसत आहे, असे मत स्मिथने व्यक्त केले.