आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराट काेहली म्हणाला, राेहित शर्मा दुखापतीतून सावरला, पण विश्रांतीची गरज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बर्मिंगहॅम - अागामी विंडीज दाैऱ्यासाठी भारतीय संघातून सलामीवीर युवा फलंदाज राेहित शर्माला बाहेर ठेवण्याच्या निर्णयाचे कर्णधार विराट काेहलीने समर्थन केले. अागामी काळात श्रीलंका अाणि दक्षिण अाफ्रिकेविरुद्ध हाेणाऱ्या मालिकेच्या दृष्टीने राेहितला विश्रांती देण्याची गरज अाहे.
 
त्यामुळे निवड समितीने विंडीज दाैऱ्यातून त्याला वगळण्याचा घेतलेला निर्णय समजदारीने घेतल्याची प्रतिक्रियाही काेहलीने दिली. कारण माेठ्या दुखापतीमधून सावरण्यासाठी राेहितला दीर्घ विश्रांतीची गरज अाहे.

यातून त्याला पुढच्या महिन्यात हाेणाऱ्या मालिकेत दर्जेदार कामगिरी करता येईल, असेही त्याने या वेळी सांगितले. दाेन दिवसांपूर्वी विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घाेषणा करण्यात अाली. यामधून राेहित अाणि जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात अाली. त्याच्या जागी संघात युवा खेळाडू ऋषभ पंत अाणि चायनामॅन कुलदीप यादवला संधी देण्यात अाली. येत्या २३ जूनपासून भारत व विंडीज यांच्यातील पाच वनडे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात हाेणार अाहे. येत्या रविवारी भारत अाणि पाकिस्तान टीम चॅम्पियन्स ट्राॅफीच्या फायनलमध्ये भिडणार अाहेत. त्यानंतर भारतीय संघ इंग्लंडवरून थेट विंडीजकडे रवाना हाेणार अाहे.
 
‘राेहित शर्माने दुखापतीमधून सावरल्यानंतर यंदा अायपीएलच्या सत्रातील सर्व सामने खेळले. याशिवाय त्याने सरस कामगिरी करताना अापल्या मुंबई इंडियन्सला अंतिम फेरी गाठून दिली अाणि किताबाचा बहुमानही मिळवून दिला. त्यानंतर त्याच्यावर माेठी शस्त्रक्रियाही झाली. मांसपेशीचा त्रास हाेण्याचा माेठा धाेका असताे. उपांत्य सामन्यात त्याला गुडघ्याचा त्रास जाणवला,’असेही काेहली म्हणाला.
 
अाफ्रिका, श्रीलंका संघाविरुद्ध कमबॅक
युवा फलंदाज राेहित शर्माला सध्या विंडीजविरुद्ध वनडे मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळाले नाही. मात्र, त्याला अागामी श्रीलंका अाणि अाॅस्ट्रेलियाविरुद्ध हाेणाऱ्या मालिकेसाठी संधी देण्यात येईल. यामुळे फिट झालेल्या राेहितला दमदार पुनरागमन करता येईल, असा विश्वास काेहलीने व्यक्त केला.
बातम्या आणखी आहेत...