आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रोहित शर्मा, वृद्धिमान साहाची कसोटी क्रमवारीत प्रगती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई - न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीच्या दोन्ही डावांत नाबाद राहून अर्धशतक ठोकणारा विकेटकीपर फलंदाज वृद्धिमान साहा आणि दुसऱ्या डावात ८२ धावा ठोकणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रमवारीत प्रगती केली आहे. साहाने १८ स्थानांच्या प्रगतीसह ५६ वे, तर रोहितने १४ स्थानांच्या प्रगतीसह ३८ वे स्थान गाठले. चेतेश्वर पुजाराला एका स्थानाचा फायदा झाला. तो १५ व्या क्रमांकावर पोहोचला आहे.

न्यूझीलंडचा फलंदाज ल्युक रोंचीनेसुद्धा १२ स्थानांची प्रगती करताना ४० वे स्थान मिळवले. त्याने दोन्ही डावांत ३५ आणि ३२ धावा काढल्या. त्याचा सहकारी टॉम लॅथमला तीन स्थानांचा फायदा झाला. तो ३३ व्या क्रमांकावर पोहोचला. फलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा स्टीव्हन स्मिथ नंबर वन आहे.

गोलंदाजांच्या यादीत आपल्या स्विंग गोलंदाजीने न्यूझीलंडला चकविणाऱ्या भुवनेश्वर कुमारला ९ स्थानांचा फायदा झाला. तो क्रमवारीत २६ व्या स्थानी पोहोचला.
बातम्या आणखी आहेत...