आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोमन रेगंसने या रेसलरची अशी केली धुलाई, बचावासाठी आली होती पत्नी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोमनने मिजची धुलाई करून रिंगमधून बाहेर फेकले. - Divya Marathi
रोमनने मिजची धुलाई करून रिंगमधून बाहेर फेकले.
मियामी - काही दिवसांपूर्वी झालेल्या WWE स्मैकडाउन इव्हेंटमध्ये वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियन रोमन रेगंसने रेसलर द मिजची जबरद्स्त धुलाई केली होती. रेगंसने मिजला एवढे चोपले होते की, रेगंसच्या तावडीतून मिजची सुटका करण्यासाठी अक्षरशः मीजच्या पत्नीलाच तेथे यावे लागले. मात्र तिच्या येण्याचाही काही उपयोग झाला नाही. रेगन्स मिजची धुलाई करतच होता. अखेर ही फाइट रोमनने एकतरफा जिंकली.
का केली धुलाई...
- खरे तर, फाइटच्या सुरुवातीला मिज पत्नी मरीसे व्होलेटसह रिंगमध्ये आला.
- तो रिंगमध्ये येताच रोमनला म्हणाला, कार्ल अँडरसन आणि ल्यूक गॅलोस नेहमीच तुला त्रास देतील. यासाठी सावध रहा.
- एवढेच नाही, मिजने रोमनवर काही विवादास्पद कॉमेंटदेखील केल्या. यामुळे चिडलेल्या रोमनने त्याची धुलाई करायला सुरूवात केली होती.
- रोमच्या धुलाईपासूनल मिजचा बचाव करण्यासाठी त्याची पत्नी मरीसे वोलेटला रिंगमध्ये यावे लागले.
- आपल्याला माहितच असेल की, कार्ल आणि ल्यूकने नुकत्याच झालेल्या एका फाइटदरम्यान रोमनच्या विरोधकांची बाजू घेत अचानकपणे रोमनवर हल्ला केला होता.
- रोमन रेगसला या दोघांच्या हल्ल्यातून एजे स्टाइल्सने वाचवले होते.
येथेही कार्ल आणि ल्यूक ने घेतली बाजू...
-फाइटच्या अखेरीस रेगंसचा विजय झाला. या फाइट नंतर रेगंस आणि एजे यांच्यात फाइट रंगली.
- मात्र पुन्हा कार्ल अॅंडरसन आणि ल्यूक गेलोसने तेथे येऊन रेगंसची धुलाई केली.
- मग पुन्हा रेगंसचा बचाव करण्यासाठी उसोस आला आणि परत एकदा तुंबळ फाइट झाली. अखेर एजेने रिंगमधून काढता पाय घेतल.
पुढील स्लाइड्सवर फोटोतून पाहा, फाइटचा थरार आणि कशी आली रिंगमध्ये मिजची पत्नी....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...