स्पोर्ट्स डेस्क- पोर्तूगालच्या फुटबॉल टीमचा कर्णधार आणि स्पॅनिश क्लब रियाल मॅद्रिदचा स्टार प्लेयर ख्रिस्टियानो रोनाल्डो चौथ्यांदा वर्षातील सर्वोत्तम फुटबॉलर ठरला. त्याने अर्जेंटिनाचा स्टार प्लेयर आणि बार्सिलोनाचा फारवर्ड लियोनेल मेस्सीला धोबीपछाड देत हा किताब मिळवला. हा अवॉर्ड घेण्यासाठी रोनाल्डो आपली गर्लफ्रेंड आणि मुलासमवेत इव्हेंटमध्ये पोहचला. सर्वात जास्त मिळाली मते....
- इंटरनॅशनल फुटबॉल महासंघ (फिफा)चे प्रेसिडेंट जियानो इन्फेंटिनो यांनी स्वित्झरलँडमधील ज्यूरिच येथे झालेल्या इव्हेंटमध्ये रोनाल्डोला 'प्लेयर आफ द ईयर' चा अवॉर्ड दिला.
- रोनाल्डो याआधी 2008, 2013 आणि 2014 या सालात 'प्लेयर आफ द ईयर' ठरला होता.
- 31 वर्षाच्या रोनाल्डोने मागील 57 मॅचेसमध्ये 55 गोल डागले आहेत. याशिवाय 16 गोल करण्यास मदत केली आहे.
- रोनाल्डोच्या खेळामुळेच त्याच्या टीमने मागील वर्षी चार ट्रॉफी आपल्या नावावर केल्या आहेत.
- बेस्ट फुटबॉलरच्या शर्यतीत मेस्सी दुसरा तर फ्रान्सचा एंटोनियो ग्रिएजमॅन तिसरा नंबरवर राहिला.
- पोर्तूगालला मागील वर्षी यूरो कप जिंकून देणारा रोनाल्डोला एकून 34.54 टक्के मते तर मेस्सीला 26.42 आणि ग्रिएजमॅनला 7.53 टक्के मते मिळाली.
अमेरिकेची कारली ठरली बेस्ट फिमेल फुटबॉलर-
- अवॉर्ड इव्हेंटमध्ये अमेरिकेच्या कारली लायडला सलग दुस-यांदा बेस्ट फिमेल फुटबॉलरचा अवॉर्ड मिळाला.
- याशिवाय इटलीच्या क्लॅडियो रानीरी वर्षातील सर्वोत्तम कोच ठरले.
- मलेशियन सुपर लीग पेनांगच्या मोहम्मद फेज सबरीला वर्षातील सर्वोत्तम गोल केलेला खेळाडू ठरला.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, या अवॉर्ड नाईट दरम्यान कसा होता नजारा....