आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रॉस टेलरचे द्विशतक; किवीचे ५१० धावांचे दमदार प्रत्युत्तर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पर्थ- न्यूझीलंडच्या राॅस टेलरने (नाबाद २३५) रविवारी अाॅस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या कसाेटीच्या पहिल्या डावात द्विशतक ठाेकले. त्यामुळे न्यूझीलंडला पहिल्या डावात तिसऱ्या दिवसअखेर ६ गड्यांच्या माेबदल्यात ५१० धावा काढता अाल्या.

यात विल्यमसनने १६६ धावांचे याेगदान दिले. संघ अद्याप ४९ धावांनी पिछाडीवर असून ४ विकेट शिल्लक अाहेत. टेलर व क्रेग (नाबाद ७) हे दाेघे मैदानावर खेळत अाहेत. अाॅस्ट्रेलियाने पहिला डाव ५५९ धावांवर घाेषित केला. न्यूझीलंडने २ बाद १४० धावांच्या पुढे खेळताना विल्यमसन व टेलरने तिसऱ्या विकेटसाठी २६५ धावांची भागीदारी केली. विल्यमसनने १६६ आणि कर्णधार मॅक्युलने २७ धावा केल्या.