आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराटच्या जबरदस्त फिटनेसमागे या व्यक्तीचा हात, स्वत:ही कोणाला नाही कमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शंकर बासु टीम इंडियाचे फिटनेस कोच आहेत. त्यांच्या सूचनेनुसारच विराट कोहली फिटनेस ट्रेनिंग घेतो. - Divya Marathi
शंकर बासु टीम इंडियाचे फिटनेस कोच आहेत. त्यांच्या सूचनेनुसारच विराट कोहली फिटनेस ट्रेनिंग घेतो.
स्पोर्ट्स डेस्क- टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात फिट क्रिकेटर्सपैकी एक मानला जातो. त्याच्या यशाचे राज त्याचा फिटनेस हेच आहे. यो-यो टेस्टमध्ये त्याचा स्कोर (21) आला जो टीम इंडियात सर्वात जास्त आहे. या बाबतीत विराटचा कोणीही हात धरू शकत नाही. मात्र, विराट आपल्या फिटनेसचे क्रेडिट टीम इंडियाचा फिटनेस कोच शंकर बासुला देतो. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली सरावापासून ते एक्सरसाईज करतो. कोण आहे शंकर बासु...
 
- शंकर बासु टीम इंडियाचा फिटनेस ट्रेनर आहे. इंडियन क्रिकेटर्सच्या फिटनेसमागे शंकर यांचा महत्त्वाचा रोल राहिला आहे.
- नुकतेच झालेल्या यो-यो टेस्टमध्ये फेल झाल्याने युवराज आणि रैनाचे सिलेक्शन टीम इंडियात होऊ शकला नाही. ती टेस्ट सुद्धा शंकर यांनीच कल्पना होती. 
- शंकर टीम इंडियाशिवाय IPL टीम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या स्ट्रेंथ आणि कंडीशनिंग कोच सुद्धा आहे. ज्याचा कर्णधार विराट कोहली आहे. 
- IPL आणि टीम इंडियात एकत्रच असल्याने विराट कोहली आणि शंकर बासु यांच्यात सख्य आहे. विराट आपल्या फिटनेसचे क्रेडिट सुद्धा शंकर यांनाच देतो. 
- विराटशिवाय आर. अश्विन, दीपिका पल्लीकल (स्क्वॅश प्लेयर), जोशना चिनप्पा (स्क्वॅश प्लेयर) आणि दिनेश कार्तिकसारख्या खेळाडूच्या यशस्वी फिटनेसमागे शंकर बासु हेच आहेत. 
-  RCB टीममधील ख्रिस गेल आणि एबी डिविलियर्स सारख्या क्रिकेटर्सला सुद्धा शंकर हे टिप्स देत असतात. 
 
अॅथलीट राहिलेत बासु-
 
- शंकर बासु सुरुवातीच्या काळात अॅथलीट राहिले आहेत. ज्यांनी 1987 मध्ये जपानमध्ये झालेल्या एशियन जूनियर चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
- अनेक वर्षे नॅशनल क्रिकेट अॅकेडमीत ट्रेनर म्हणून पाहिल्यानंतर शंकर यांना टीम इंडियाच्या फिटनेस ट्रेनरची जबाबदारी दिली गेली.
- बासु असे व्यक्ती आहे ज्यांनी जून 2015 मध्ये टीम इंडियासोबत जोडताच इंडियन टीमच्या फिटनेस टेस्टच्या पद्धतीत आधुनिक बदल करत डेक्सा स्केन, डुअल एनर्जी एक्सरे, लोड मॉनिटरिंग एप औआणि यो-यो ट्रेनिंग पद्धती आणल्या. 
- बासु चेन्नईमध्ये फिटनेस सेंटर्स चेन सुद्धा चालवतात. जे प्राईमल पॅटर्न्स होलिस्टिक फिटनेस नावाने आहे. तेथे ते डायरेक्टर म्हणून काम करतात.
- बासुने कोहलीच्या फिटनेसवर खूप जबरदस्त काम केले. विराटच्या फिटनेसचे राज बासुचे लेटेस्ट पॉवर ट्रेनिंग टेक्निक्स हेच आहे. 
- तर, उमेश यादवच्या फिजिकल ट्रान्सफोर्मेशनमागे शंकर बासु यांचा मोठा वाटा आहे. अश्विन आणि भुवनेश्वरचा फिटनेस लेवल वाढविण्यात शंकर यांनी रोल निभावला. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, शंकर यांचे पर्सनल लाईफ कसे आहे ते पाहा त्यांनी शेयर केलेल्या फोटोतून...
बातम्या आणखी आहेत...