आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Snapshot: Sachin Tendulkar Gives His Voice To 'Swacch Bharat Abhiyaan'

रैनानंतर सचिनही बनला गायक, वाचा बॉलीवुड सिंगर्ससोबत कोणते गायले गाणे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शंकर महादेवन सोबत सचिन तेंडुलकर. - Divya Marathi
शंकर महादेवन सोबत सचिन तेंडुलकर.
नवी दिल्‍ली- भारतीय अष्‍टपैलू खेळाडू सुरेश रैना नंतर मास्‍टर ब्‍लास्‍टर सचिन तेंडुलकरही गायक बनला आहे. त्‍याने मोदी सरकारच्‍या 'स्वच्छ भारत मिशन'साठी ‘स्वच्छता गीत’गायले आहे. या गाण्यामध्‍ये सचिनसोबत संगीतकार गायक शंकर महादेवनही आहे. शहरी विकास मंत्रालयाच्‍या वतिने राबवण्‍यात येत असलेल्‍या स्वच्छ भारत मिशनला जनआंदोलनाचे रूप देण्‍यासाठी मान्‍यवरांनी गीत तयार केले आहे. देशवासियांमध्‍ये एकता निर्माण करून स्‍वच्‍छतेसाठी त्‍यांना प्रेरित करणे हा गीत गायनाचा उद्देश आहे.
प्रसून जोशी यांनी लिहीले गाणे
हे गाणे प्रसिद्ध गीतकार प्रसून जोशी यांनी लिहीले आहे. त्‍याला शंकर-एहसान-लॉय या तिघांनी संगीत दिले आहे. शंकर महादेवन यांनी काही इतर गायकांना सोबत घऊन या गाण्‍याचे गायन केले आहे. सचिन तेंडुलकरने या गीताच्‍या काही ओळींचे गायन केले आहे. चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक मुकेश भट्ट या गायनाचा एक व्‍हिडीओही बनवत आहेत. सुत्रांच्‍या माहितीनुसार महात्‍मा गांधी यांच्‍या जयंतीला 2 ऑक्‍टोंबरला हे गीत प्रसारीत होण्‍याची शक्‍यता आहे.

पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, संबंधित फोटो..