आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुस्तीपटू याेगेश्वर दत्त उदार मनाचा, सचिनकडून याेगेश्वरवर काैतुकाचा वर्षाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारताचा मल्ल याेगेश्वर दत्तने हा उदार मनाचा अाहे. खिलाडूवृत्तीचा प्रत्यय अाणून देताना त्याने केलेले कार्य महान अाहे, अशा शब्दांत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने याेगेश्वरवर काैतुकाचा वर्षाव केला. रशियाचा मल्ल कुडुखाेव डाेपिंगमध्ये दाेषी असल्याचे समाेर अाले. मात्र, मृत्यूनंतर हे समाेर अाल्याने त्याकडील राैप्यपदक परत घेताना ते त्याच्या कुटंुबीयांकडे ठेवण्यात यावे, असे याेगेश्वरने सांगून उदारपणाचा प्रत्यय अाणून दिला. लंडन अाॅलिम्पिकमध्ये याेगेश्वरने कांस्य कुडुखाेवने राैप्य जिंकले हाेते. मात्र, कुडुखाेव दाेषी अाढळल्याने राैप्यपदक हे याेगेश्वरला मिळणार हाेते.

‘याेगेश्वरने उदारपणाचा अाणून दिलेला प्रत्यय हा काैतुकास्पद अाहे. त्याच्या या कामगिरीचा सर्वांना अभिमान अाहे. त्याच्यातल्या खिलाडू वृत्तीमुळे हे सर्व काही शक्य झाले. त्याने घेतलेला निर्णय हा महत्त्वपूर्ण अाहे,’ असेही सचिन म्हणाला. त्याचे सर्वत्र काैतुक हाेत अाहे.
बातम्या आणखी आहेत...