आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिन-वॉर्न लावणार अमेरिकेला वेड, अाॅल स्टार्स क्रिकेट लीग अाजपासून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - क्रिकेट या चेंडूफळीच्या खेळाची ओळख अमेरिकन क्रीडारसिकांना करून देण्यासाठी गोलंदाजीचा शहेनशहा शेन वॉर्न व फलंदाजीचा अनभिषिक्त सम्राट सचिन तेंडुलकर पुढे सरसावले असून त्यांच्या पहिल्या प्रयत्नांना शनिवारपासून सिटी फील्ड, न्यूयॉर्क येथे सुरुवात होत आहे. ११ नोव्हेंबरला ह्युस्टनला व १४ नोव्हेंबरला लॉस एंजलिसला सामने होतील.

ट्वेन्टी-२०चा हा सामना बेसबॉलच्या प्रेमात असलेल्या अमेरिकन क्रीडारसिकांना रोमहर्षक समारोपाची झिंग देईल, असा विश्वास सचिन तेंडुलकरने व्यक्त केला आहे. ४५ हजार प्रेक्षक क्षमतेच्या सिटी फील्ड, या न्यूयॉर्कमधील प्रमुख बेसबॉल स्टेडियमवर सलामीचा सामना खेळवला जाणार आहे.

न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजच्या दिवसाच्या शुभारंभाचा आणि समारोपाचा घंटानाद करण्याची संधी यापूर्वी अनेक मान्यवर भारतीयांना मिळाली होती. या वेळी प्रथमच क्रिकेटपटू या ‘बेल’चा घंटानाद करतील. या सिरीजचे १५ सामने तीन वर्षांत आयोजित करण्याचा मनोदय वॉर्नने व्यक्त केला.

क्रिकेट विश्वव्यापी करण्याचे स्वप्न : सचिन
‘क्रिकेट विश्वव्यापी करण्यासाठी आपला प्रयत्न असल्याचे सचिनने सांगितलेे. अमेरिकेच्या होतकरू खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी, त्यांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी हा प्रयत्न करीत आहोत. या मालिकेमुळे क्रिकेटच्या ऑलिम्पिक प्रवेश प्रयत्नांनाही बळ मिळेल, असा विश्वास तेंडुलकरने व्यक्त केला. निवृत्तीनंतरही आपण आणि वॉर्नने बॅट पुन्हा हाती घेतली याचे मुख्य कारण क्रिकेट हा खेळ विश्वव्यापी करण्याचे आमचे स्वप्न आहे.

दोन्ही संघ असे
सचिन्स ब्लास्टर्स : सचिन तेंडुलकर (कर्णधार), वीरेंद्र सेहवाग, सौरव गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण, ब्रायन लारा, शोएब अख्तर, मोईन खान, महेला जयवर्धने, मुथय्या मुरलीधरन, कार्ल हुपर, स्वान, कार्टली एंब्राेस, ग्लेन मॅकग्रा, शाॅन पाेलाक, क्लुजनर.
वॉर्नस वॉरिअर्स : शेन वाॅर्न (कर्णधार), अजित आगरकर, वसीम अक्रम, मॅथ्यू हेडन, रिकी पाँटिंग, मायकल वॉन, जाँटी ऱ्होड्स, कुमार संगकारा, सकलेन मुश्ताक, सायमंड्स, काेर्टनी वॉल्श, अॅलन डाेनाल्ड.
बातम्या आणखी आहेत...