आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO : प्रॉमिस करा, विना हेल्मेट गाडी चालवणार नाही, तरुणांना सचिनने दिला संदेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सचिनने त्याच्या ट्वीटर अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात मास्टर ब्लास्टर सिग्नलवर त्याच्या कारच्या बाजुला एका बाईटवर बसलेल्या तरुणांना हेल्मेट परिधान करून गाडी चालवण्याचा सल्ला देताना दिसत आहे. - Divya Marathi
सचिनने त्याच्या ट्वीटर अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात मास्टर ब्लास्टर सिग्नलवर त्याच्या कारच्या बाजुला एका बाईटवर बसलेल्या तरुणांना हेल्मेट परिधान करून गाडी चालवण्याचा सल्ला देताना दिसत आहे.
मुंबई - सचिन तेंडुलकर रोड सेफ्टीबाबतही नेहमी सतर्क असतो. याबाबतचा एक व्हिडीओ त्याने नुकताच ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. त्यात मास्टर ब्लास्टर त्याच्या कारच्या बाजुला बाईकवर बसलेल्या दोन मुलांना हेलमेट परिधान करून गाडी चालवण्याचा सल्ला देताना दिसत आहे. यापुढे हेल्मेट परिधान करूनच गाडी चालवण्याचे वचनही सचिन त्या तरुणांकडून घेताना दिसत आहे. 

काय आहे प्रकरण 
- व्हिडीओ कधीचा आणि कुठला आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण या व्हिडीओद्वारे सचिनने रोड सेफ्टी किती गरजेची आहे, हा संदेश दिला आहे. 
- सचिन कारच्या मागच्या सीटवर बसलेला दिसत आहे. त्याच्या गाडीच्या अगदी बाजुला एका बाईकवर दोन मुले दिसत आहे. 
- दोन्ही तरुण सचिनला कारमध्ये पाहताच खूश होतात. त्यानंतर लगेचच ते मोबाईल काढून सेल्फी क्लिक करू लागतात. 
- सचिन त्यांना समजावत हेल्मेट परिधान करायला सांगतो. हेलमेट डालो, असे तो त्यांना म्हणतो. 
- त्यानंतर मास्टर ब्लास्टर दोन्ही तरुणांकडून वचन घेतो की, भविष्यात ते जेव्हाही गाडी चालवतील तेव्हा हेल्मेट नक्की परिधान करतील. 

लाल सिग्नलवर थांबते सचिनची कार 
- हा प्रसंग एका ट्राफिक सिग्नलवरील आहे. सचिन कारमध्ये बसलेला आहे, त्याचा ड्रायव्हर एका सिग्नलवर गाडी थांबवतो. 
- यादरम्यान अनेकांची नदर सचिनच्या कारवर पडते. सचिन सर्वांना हात दाखवतो. 
- सचिन सध्या आयपीएल-10 मध्ये मुंबई इंडियन्सच्या मेंटॉरच्या भूमिकेत आहे. 
- व्हिडीओत सचिन सांगतो की, रोड सेफ्टी सर्वात महत्त्वाची आहे. त्याची काळजी घेणे गरजेचे आहे. व्हिडीओत सचिनचे संपूर्ण संभाषण हिंदीत आहे. ट्विटरवर सचिनच्या फॅन्सनी यासाठी त्याचे कौतुक केले. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
बातम्या आणखी आहेत...