आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sachin Tendulkar Autobiography Enters Limca Book Of Records

सचिनच्या ऑटोबायोग्राफीचा लिम्का बुकमध्ये समावेश, काय आहे यात खास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सचिन तेंडुलकरची ऑटोबायोग्राफी 'प्लेइंग इट माय वे'... - Divya Marathi
सचिन तेंडुलकरची ऑटोबायोग्राफी 'प्लेइंग इट माय वे'...
नवी दिल्ली- सचिन तेंडुलकरच्या ऑटोबायोग्राफी 'प्लेइंग इट माय वे' चा लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये समावेश झाला आहे. हे पुस्तक बूक फिक्शन आणि नॉन फिक्शन या दोन्ही कॅटेगिरीत बेस्टसेलर ठरले आहे. या ऑटोबायोग्राफीने जगातील टॉप हार्डबुक्स जेके राउलिंगचे 'कॅजुअल व्हॅकन्सी', वॉल्टर इसाकसनचे 'स्टीव जॉब्स' आणि डेन ब्राउनचे 'इन्फर्नों' या पुस्तकांनाही मागे टाकले आहे.
का विषेश आहे सचिनची ऑटोबायोग्राफी...
- 'प्लेइंग इट माय वे' लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सच्या 'बेस्टसेलिंग अडल्ट हार्डबुक ऑन रिलीज' मध्ये समाविष्ट झाले आहे.
- 'प्लेइंग इट...' ला 6 नोव्हेंबर, 2014 ला हॅशेट इंडियाने पब्लिश केले आहे.
- अतापर्यंत त्याच्या 1 लाख 50 हजार 289 प्रतींसाठी ऑर्डर आल्या आहेत.
- ऑटोबॉयोग्राफीसाठी सचिन तेंडुलकर शिवाय क्रिकेट एक्सपर्ट बोरिया मजूमदार यांनीही लेखन केले आहे.
- या पुस्तकाची किंमत 899 रुपये एवढी आहे.
- अतापर्यंत येकूण 13 कोटी 51 लाख रुपयांची पुस्तके विकली गेली आहेत.
असा आहे सचिनचा दावा?
- शांत स्वभाव असलेल्या सचिनने आत्मचरित्रात ग्रेग चॅपल आणि कपिल देव यांच्यावर टिका टिपन्नीही केली आहे.
- "प्लेइंग इट माय वे" मध्ये सचिनने त्याच्या जीवनातील काही सत्य घटना या पुस्तकात लिहिल्या आहेत. आसा दावाही त्याने केला आहे.
- कसल्याही प्रकारचा वाद उभा करण्याचा आपला हेतून नसल्याचेही सचिनने म्हटले आहे. मात्र चॅपल आणि कपिल यांच्यावर केलेल्या टिकेमुळे सचिनचे हे पुस्तक अधिकच चर्चेत आले आहे.
- विक्री सुरू होण्या आधी (सहा नोव्हेंबर सकाळी 11.30 पर्यंत) साधारणपणे दिडलाख प्रतींची बुकिंग झाली होती. या पुस्तकाने डॅन ब्राउनच्या ‘इनफर्नो, वाल्टर इसाकसनच्या ‘स्टीव जॉब्स‘ आणि जेके राउलिंगच्या ‘कॅजुअल व्हॅकंन्सी‘च्या प्री आर्डर आणि टोटल सेलचा विक्रम मोडला आहे.
विवादांशी संबंध
- भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक जॉन राइट यांच्या ‘इंडियन समर्स‘ या पुस्तकातून पहिल्यांदा भारतीय ड्रेसिंग रूममधील अनेक भेत समोर आले होते.
- रिकी पोन्टिंगने त्याची आत्मकथा ‘पोन्टिंग− अॅट द क्लोज ऑफ प्ले' या पुस्ताक हरभजन आणि सायमंडस यांच्यातील बद्दल बीसीसीआय आणि टीम इंडियावर टिका केली होती.
- शोएब अख्तरने त्याच्या ऑटोबायोग्राफीत सचिन तेंदुलकर आणि राहुल द्रविड सारख्या दिग्गज फलंदाजांच्या टेक्निकवर प्रश्न चिन्ह उपस्थित करत सर्वांना आश्चर्य चकित केले होते.
- ऑस्ट्रेलियन क्रिकेटर अॅडम गिलक्रिस्टने ऑटोबायोग्राफी ‘ट्रू कलर्स’ मध्ये लिहिले होते की, सचिन तेंदुलकरमध्ये स्पोर्टसमन स्पिरिटची कमी आहे.

पुढील स्लाइड्सवर वाचा,- सचिनने आईला दिली होती पहिली प्रत...
- का रागावले अचरेकर सर...
- कपिलमुळे का झाला नाराराज...
- त्यारात्री सचिनला झोपच आली नाही...
- काय म्हणाला इयान चॅपलला...