आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनेक दिग्गज क्रिकेटरच्या विरोधानंतर सचिनचा त्याला पाठिंबा! का दिला सपोर्ट, वाचा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरातील अनेक दिग्गज क्रिकेटर्सनी त्याला विरोध केल्यानंतरही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आमिरच्या आंतरराष्ट्रीय पुर्नरागमनाचे समर्थन केले आहे. - Divya Marathi
जगभरातील अनेक दिग्गज क्रिकेटर्सनी त्याला विरोध केल्यानंतरही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आमिरच्या आंतरराष्ट्रीय पुर्नरागमनाचे समर्थन केले आहे.
लंडन- इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात आजपासून कसोटी मालिका सुरु झाली आहे. या कसोटीदरम्यान सर्वांच्या नजरा पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर याच्यावर खिळल्या आहेत. ज्याच्यावर सहा वर्षापूर्वी स्पॉट फिक्सिंगच्या आरोपानंतर बंदी घातली होती. लार्ड्सवर होणा-या या महत्त्वाच्या लढतीपूर्वी मोहम्मद आमिरसाठी एक चांगली बातमी मिळाली. जगभरातील अनेक दिग्गज क्रिकेटर्सनी त्याला विरोध केल्यानंतरही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आमिरच्या आंतरराष्ट्रीय पुर्नरागमनाचे समर्थन केले आहे. काय म्हणाला सचिन...
- तेंडुलकरने मोहम्मद आमिरला क्रिकेट खेळण्यासाठी पाठिंबा दिला आहे.
- तेंडुलकरने सांगितले की, मी गेली काही दिवस आमिरच्या मुलाखती पाहिल्या आहेत. आता तो पहिल्यापेक्षा खूपच परिपक्व झाला आहे. तो आता समजदार झाला आहे व मैदानावरही तो असाच वागेल.
- सचिनच्या म्हणण्यानुसार, आमिरने केलेल्या चुकीबाबत शिक्षा भोगली आहे. यानंतर पुन्हा नव्या जोशाने तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतत आहे तर त्यात काहीही चुकीचे नाही.
- आमिरचे कौतूक करताना सचिन म्हणाला की, आमिर खूपच टॅलेंटेड गोलंदाज आहे. जर इंग्लंड दौ-यात त्याने अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली तर तो इंग्लंडसाठी खूपच धोकादायक ठरू शकतो.
काय झाले होते आमिरसोबत?
- आमिरला 2010 साली लॉर्ड्स कसोटीत स्पॉट फिक्सिंग आरोपाखाली अटक केली होती.
- यानंतर तो यात दोषी आढळला होता. त्याच्यावर आयसीसीने पाच वर्षाची बंदी घातली होती.
- एका टॅबलॉयड न्यूज पेपरच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये आमिर आणि त्याचा सहकारी बॉलर मोहम्मद आसिफने कर्णधार सलमान बटच्या सांगण्यावरून जाणून-बुझून नोबॉल टाकला होता.
- या प्रकरणात या तीनही क्रिकेटवर 5 वर्षाची बंदी घातली गेली. तुरुंगातही जाऊन आले.
- आमिरने त्या सामन्यातील पहिल्या डावात 84 धावा देऊन 6 विकेट काढल्या होत्या. मात्र, तो दोषी आढळल्याने लोक त्याची चांगली कामगिरी लक्षात घेतली नाही.
- आता या घटनेला सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. सहा वर्षानंतर पुन्हा एकदा आमिर ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर इंग्लंडविरोधात कसोटी मालिका खेळण्यास उतरला आहे.
- सध्या सराव सामन्यात आमिरने समरसेटविरोधात चार विकेट घेत चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडेही सर्वांचे बारीक लक्ष आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, सहा वर्षानंतर संघात परतलेला आमिर कसा कॉन्फिडंट दिसत आहे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...