Home »Sports »From The Field» Saha And Smith In India Vs Australia Third Test In Ranchi

साहा-स्मिथची ‘कुस्ती’; चेंडूला डेडबॉल घोषित करणारे पंच गोल्ड यांना हसू आवरले नाही!

दिव्य मराठी | Mar 17, 2017, 01:59 AM IST

  • चेंडू पॅडमध्ये अडकला...
रांची-तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी अशी एक घटना घडली, ज्यामुळे सगळे जण हसले. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीच्या ८० व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूच्या वेळी ही घटना घडली. जडेजाचा चेंडू नीट खेळण्यात स्मिथ अपयशी ठरला आणि चेंडू त्याच्या पॅडमध्ये अडकला. स्मिथ त्या वेळी ९७ धावांवर होता. त्याला बाद करण्याची संधी साहाला सोडायची नव्हती. दृश्य असे होते जणू काही दोघे कुस्ती लढत आहेत. पंच इयान गोल्डसह आजूबाजूला असलेल्या सर्व खेळाडूंना हसू आवरले नाही. अखेर साहाने चेंडू हातात घेऊन अपील केली. तोपर्यंत पंचांनी चेंडू डेडबॉल म्हणून घोषित केला होता. शिवाय रिप्लेेत चेंडू बॅटला लागला नसल्याचे स्पष्ट झाले.

बॅटला चेंडू लागला असता तरीही स्मिथ नाबाद असता...
क्रिकेटच्या नियम २३ नुसार चेंडू फलंदाजाचे कपडे किंवा प्रोटेक्टिव्ह गिअरमध्ये (पॅड, हेल्मेट आदी) अडकला तर तत्काळ डेड घोषित केला जातो. त्या चेंडूवर स्मिथची बॅट लागली असती तरीही डेडबॉल असल्याने तो नाबाद राहिला असता.
पुढील स्लाइडवर पाहा काय झाले....

Next Article

Recommended