आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोनीला पाठिंबा देण्यासाठी पत्नी साक्षीची ‘बोलंदाजी’! ट्विट करून साक्षीचे हर्ष गोयंकाला उत्तर!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- आयपीएल-१० मध्ये पुणे सुपर जायंट्सचे नेतृत्व स्टिवन स्मिथकडे दिल्यापासून धोनीचे चाहते आणि पुण्याचे संघ मालक याच्यात युद्धच सुरू झाले आहे, असे दिसते. पुण्याचे संघ मालक व माजी कर्णधार  धोनी यांच्यात सर्वकाही ठीक नसल्याचे दिसून येते. काही दिवसांपूर्वी पुणे संघाचे मालक संजीव गोयंका यांचे भाऊ हर्ष गोयंका यांनी धोनीबाबत ट्विट करून वाद वाढवला. आता त्यांनी पुन्हा ट्विट केल्याने धोनीची पत्नी साक्षीनेही या वादात उडी घेतली असून, तिने धोनीची बाजू घेताना हर्ष गोयंका यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.  

हे पहिले आयपीएल आहे ज्यात धोनी दुसऱ्या खेळाडूच्या नेतृत्वात खेळत आहे. याआधी आयपीएलच्या सर्व १४३ सामन्यांत कर्णधार म्हणून धोनी खेळला. या वेळी धोनी ऑस्ट्रेलियाचा खेळाडू स्टिवन स्मिथच्या नेतृत्वात खेळत अाहे. क्रिकेटचे मैदान असो की जीवनातील कोणतेही संकट..साक्षी धोनीच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभी असते.  या वेळीसुद्धा तिने याची प्रचिती दिली. साक्षीने पुणे सुपरजायंट्स संघाचे सहमालक हर्ष गोयंका यांना सोशल मीडियावर जोरदार उत्तर दिले.   

काही दिवसांपूर्वी हर्ष गोयंका यांनी पहिला सामना जिंकल्यानंतर ट्विट केले होते. त्यात त्यांनी जंगलाचा खरा राजा कर्णधार स्टिव स्मिथ असल्याचे सांगताना नेतृत्व बदलण्याचा निर्णय योग्य असल्याचे म्हटले. यानंतर धोनीच्या चाहत्यांनी गोयंका यांना “लक्ष्य’ केल्यानंतर आणि त्यांच्यावर टीकेचा भडिमार झाल्यानंतर गोयंका यांनी ते ट्विट डिलीट केले होते. अाता शनिवारी पुण्याचा दुसरा पराभव झाल्यानंतर हर्ष गोयंका यांनी पुन्हा ट्विट केले. यांत त्यांनी पुणे खेळाडूंच्या स्ट्राइक रेटचा स्क्रीन शॉट शेअर केला. यात त्यांनी लिहिले की, मनोज तिवारी, रहाणे आणि क्रिस्टियन यांचा स्ट्राइकरेट सर्वांत उत्तम आहे. हर्ष यांनी धोनीचे नाव घेतले नाही. मात्र, स्क्रीनशॉटमध्ये धोनीचे नाव पाचव्या क्रमांकावर होते. यामुळे धोनीचे चाहते पुन्हा नाराज झाले. चाहत्यांनी गोयंका यांना जोरदार उत्तर दिले. एका चाहत्याने म्हटले की, ‘धोनी असा खेळाडू ज्याच्या ड्रेसिंग रूममधील उपस्थितीने संघात एक नवी ऊर्जा आणि उत्साह निर्माण होतो.’   

धोनीने स्वत: यावर प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, त्याची पत्नी साक्षी गप्प बसली नाही. साक्षीने अापल्या पोस्टमध्ये कोणाचे नाव घेतले नाही. मात्र, पोस्ट वाचून ती धोनीच्या अवमानाचे उत्तर देत आहे, असे वाटत होते. साक्षीने उत्तर देण्याआधी चेन्नई सुपर किंग्जचे हेल्मेट घातलेला आपला फोटो अपलोड केला आणि आपण चेन्नईला अजूनही मिस करतोय, असे दाखवले. 

गोयंका यांचे नाव न घेता साक्षीने केले ट्विट...
फोटो पाेस्ट केलेल्या मेसेजमध्ये साक्षीने लिहिले की, ‘कर्माचा नियम आहे की पक्षी जिवंत असताना मुंग्यांना खातात. पक्षी मेल्यावर मुंग्या त्याला खातात. वेळ व परिस्थितीत बदल हाेऊ शकताे. यामुळे कोणालाच कमी लेखू नये व दु:खही पोहोचवू नये. आज तुम्ही शक्तिशाली असू शकता.. मात्र, वेळ तुमच्यापेक्षा अधिक बलवान आहे. एका झाडातून माचिसच्या लाखो काड्या तयार होतात, मात्र एक माचिसची काडी लाखो झाडांना जाळू शकते. यामुळे चांगले बना व चांगले काम करत रहा..’
पुढील स्लाईडवर क्लिक करून फोटोज पाहा... 
बातम्या आणखी आहेत...