आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वनडेसाठी अाज टीम इंडियाची निवड; महेंद्रसिंग धाेनी, युवराजवर खास नजर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- येत्या रविवारपासून भारत अाणि यजमान श्रीलंका यांच्यातील पाच वनडे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात हाेणार अाहे. यासाठी रविवारी भारताच्या वनडे संघाची निवड केली जाईल. यादरम्यान महेंद्रसिंग धाेनी अाणि युवराज सिंगवर निवड समितीची खास नजर असेल. कारण अागामी मालिकेसाठी नव्या युवा चेहऱ्यांना संधी देण्याची चर्चा हाेती. यामुळे सीनियर खेळाडूंना विश्रांती देण्यात येण्याची शक्यता अाहे. कसाेटी मालिकेनंतर अापण खेळत राहणार अाहोत. त्यामुळे वनडे मालिकेसाठीही मी उपलब्ध अाहे. विश्रांतीची काेणतीहीची याेजना नाही, अशी प्रतिक्रिया विराट काेहलीने दिली.  

ऋषभ, कार्तिकचे स्थान अडचणीत
मालिकेत खेळण्यासाठी उत्सुक असलेल्या ऋषभ पंत अाणि दिनेश कार्तिकचा भारतीय संघातील सहभाग अडचणीत सापडण्याची शक्यता अाहे. धाेनी व युवराज सिंगला संघामध्ये स्थान मिळाल्यास या दाेन्ही युवा खेळाडूंना विश्रांती दिली जाईल.

असे अाहेत दावेदार
टाॅप अाॅर्डर :
शिखर धवन, राेहित शर्मा, लाेकेश राहुल, रहाणे,  विराट.  
मिडल अाॅर्डर : धाेनी, युवराज, केदार जाधव, मनीष पांडे, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, श्रेयस अय्यरमधून निवड.  
अाॅलराउंडर : हार्दिक पंड्या
स्पिनर : अश्विन, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, अक्षर, क्रुणाल पंड्या.  
वेगवान गाेलंदाज : भुवनेश्वर, उमेश यादव, माे. शमी, जसप्रीत बुमराह, जयदेव उनादकट, शार्दूल ठाकूर.
बातम्या आणखी आहेत...