आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संगकारा घेणार याच महिन्यात निवृत्ती; भारताविरुद्ध दोन कसोटीनंतर क्रिकेटला अलविदा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारताविरुद्ध तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दोन सामने खेळल्यानंतर श्रीलंकेचा दिग्गज फलंदाज कुमार संगकारा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होईल. संगकाराच्या निवृत्तीसह श्रीलंका क्रिकेटच्या इतिहासातील सर्वांत सुंदर फलंदाजीच्या इतिहासाचा शेवट होईल.

भारत-श्रीलंका कसोटी मालिका १२ ऑगस्टपासून सुरू होत आहे. दुसरी कसोटी २० ते २४ ऑगस्टदरम्यान होईल. क्रिकइन्फोशी बोलताना संगकाराने मनमोकळ्या गप्पा केल्या.

बदलाला घाबरू नका
मी इतका प्रदीर्घ काळ क्रिकेट खेळलो आहे. यानंतर निश्चित माझ्या जीवनात बदल येईल. बदल चांगले असतात. बदलाला घाबरू नये, असे तो म्हणाला.

जयवर्धने माझ्यापेक्षा श्रेष्ठ
महेला जयवर्धने माझ्यापेक्षा श्रेष्ठ फलंदाज आहे, याबद्दल माझ्या मनात, डोक्यात कधीही दुमत झाले नाही. आकडेवारीसुद्धा पुरावे ठरतात. तो असा खेळाडू आहे, जो सर्व दबाव स्वत:वर घेत असे आणि दुसऱ्या खेळाडूला सहजपणे खेळण्याची संधी देत असे.

कसोटीत ११ द्विशतके
कसोटी सर्वाधिक द्विशतके ठोकण्याबाबत तो सर डॉन ब्रॅडमन यांच्या तुलनेत एक पाऊल मागे आहे. ऑस्ट्रेलियाच्या ब्रॅडमन यांनी १२ द्विशतके काढली असून संगकाराच्या नावे ११ द्विशतके आहेत.

युवांना संधी द्यायचीय
मी खूप खेळलो आहे. आता युवा खेळाडूंसाठी आपली जागा रिकामी करण्याची वेळ आली आहे. मी आणखी काही महिने किंवा १२ महिने खेळल्याने काय होईल...तर यामुळे एखाद्या युवा खेळाडूचे क्रिकेट करिअर आणखी काही महिने उशिरा सुरू होईल. हे योग्य नाही, असे त्याने नमूद केले.

सचिननंतर दुसरा
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात सचिन तेंडुलकरनंतर सर्वाधिक धावा काढण्याबाबत संगकारा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे. सचिनने ६६४ सामन्यांत ३४३५७ धावा काढल्या असून संगकाराने ५९२ सामन्यांत २७९२१ धावा काढल्या आहेत.

वर्ल्डकपमध्ये सलग चार शतकेः संगकाराने या वर्षी झालेल्या वनडे वर्ल्डकपमध्ये सलग चार शतके ठोकण्याचा विश्वविक्रम केला.
पुढी स्लाइड्सवर पाहा, संगकाराच्या कारकीर्दीची आकडेवारी
बातम्या आणखी आहेत...