आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sania Mirza All Set For Sister Anam Mirza’S Engagement

मेहुणीच्या साखरपुड्याला शोएब मलिक आलाच नाही, आता सोशल साइटवर मागितली माफी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंगेजमेंटमध्ये अकबर रशीदसह अनम मिर्जा. - Divya Marathi
एंगेजमेंटमध्ये अकबर रशीदसह अनम मिर्जा.
हैदराबाद- पाकिस्तान क्रिकेट संघाचा दिग्गज क्रिकेटर शोएब मलिक मेहुणीच्या साखरपुडा कार्यक्रमात सामील होऊ शकला नाही. वर्षातील शेवटचे ग्रॅन्ड स्लॅम यूएस ओपनचे वुमन डबल्स टायटल जिंकणार्‍या सानियाची बहिण अनमचा 17 सप्टेंबरला साखरपुडा झाला. या समारोहात कुटुंबातील सदस्य, नातलग आणि सानिया मिर्झाचे जवळची मित्र मंडळी दिसली. मात्र तिचा पती शोएब दिसला नाही. सानिया मिर्झाने बहिणीबरोबरचे काही फोटो ट्विटरवरही शेअर केले. ज्यात शोएब दिसत नाही. असे असले तरी, शोएबने अनम आणि तिचा होणारा पती अकबर यांचे ट्विटरवर अभिनंदन केले आणि कार्यक्रमाला उपस्थित न राहता आल्याने पश्चातापही व्यक्त केला.
सोशल साइटवर मागीतली माफी
शोएबने ट्वीट केले आहे की, अनम आणि अकबर यांना लग्नाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. क्षमा असावी, मी येऊ शकलो नाही, मात्र प्रॉमीस कतो की, लग्नाला नक्की येइन. सानियाने बहिणीच्या साखरपुड्यात प्रसिद्ध मनीष मल्‍होत्रा यांनी डिझाइन कलेला लहंगा परिधान केला होता. तिने सोशल मीडियावर फोटो शेअर करताना लिहिले आहे की, माझी सुंदर बहिण अनम मिर्झा.
अनमने जनसंपर्क आणि सिनेमा निर्मितीचा कोर्स केला आहे. तिचा होणारा पती अकबर रशीद हैदराबादमध्ये बिझनेसमन आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोघेही गेल्या एका वर्षापासून एकमेकांना ओळखतात.
पुढील स्लाइड्सवर पाहा, सानियाबरोबर अनम मिर्झाचे फोटो आणि वाचा शोएब मलिकचे ट्वीट...