आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इकडे सानियाची एंट्री, तिकडे फलंदाज OUT, असा जिंकला पाकिस्तानने सामना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शारजामध्ये पोहोचली सानिया - Divya Marathi
शारजामध्ये पोहोचली सानिया
शारजा - इंग्लंड संघ 49 व्या षटकात खेळत असताना भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा स्टेडियममध्ये पोहोचली. तिची एंट्री झाल्याबरोबर राहत अलीने राशिदला एका सुंदर चेंडूवर बोल्ड केले. आता पाकिस्तानला विजयसाठी तीन विकेट्स पाहिजे होत्या. त्यानंतर सानियाचा पती शोएब मलिकने इंग्लंडचा कर्णधार एलिस्टर कुकला (63) सरफराजकडे झेल देण्यास भाग पाडले. उर्वरित दोन विकेट यासिर शाहच्या खात्यात जमा झाल्या. यासिरच्या लेगब्रेक गुगली आणि ऑलराऊंडर शोएब मलिकच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानने मॅच आणि सीरिज दोन्हीवर आपले नाव कोरले. शोएब मलिकची ही कारकिर्दीतील शेवटची कसोटी होती. त्याने नुकतीच कसोटी क्रिकेट निवृत्तीची घोषणा केली होती.

शाहच्या गुगलीत फसले इंग्रज
लेगब्रेक गुगलीत तरबेज पाकिस्तानी संघाचा 29 वर्षीय यासिर शाहने (44धावा देत 4विकेट) इंग्रजांना धूळ चारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने रुट, बॅरिस्टो, ब्रॉड, स्टॉक्सला तंबूत परत पाठवले. जुल्फिकार बाबरने दोन, राहत अलीने एक, मलिकने तीन विकेट घेत विजयात महत्त्वाची भूमिक निभावली. या सामन्यासह पाकने तीन कसोटी सामन्यांच्या मालिका 2-0 ने जिंकली. दुसऱ्या कसोटीत शतक ठोकणारा मोहम्मद हफीज मॅन ऑफ द मॅच तर लेगब्रेक बॉलर यासिर शाह प्लेअर ऑफ सीरिजचा मानकरी ठरला.

156 धावांवर इंग्लड गारद
पाकिस्तानने इंग्लंडला विजयासाठी 284 धावांचे आव्हान दिले होते, मात्र इंग्लंड संघ दुसऱ्या डावात 60.3 षटकात 156 धावांत गारद झाला.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, सानिया मिर्झाचा क्रिकेट स्टेडियममधील अंदाज
बातम्या आणखी आहेत...