आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sania Mirza Martina Hingis Won Wimbledon Ladies Doubles

विजयांची मालिका, दुहेरीत तिहेरी मुकुट!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रीडा क्षेत्रात रविवारचा दिवस भारतासाठी ऐतिहासिक ठरला. भारताचा टेनिसपटू लिएंडर पेसने विम्बल्डनमध्ये मिश्र दुहेरीत विजेतेपद पटकावले. ज्युनियर गटात दुहेरीत १७ वर्षांचा सुमीत नागल विजेता ठरला. भारतीय वेळेनुसार शनिवारी उत्तररात्री संपलेल्या लढतीत महिलांच्या दुहेरीत सानिया मिर्झा विजेती ठरली. दुसरीकडे, अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वातील टीम इंडियाने दुसऱ्या वनडेत िझम्बाव्वेवर विजय मिळवत मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली.
विम्बल्डन जिंकणारी सानिया पहिली भारतीय
सानिया विम्बल्डन जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली. तिने हिंगीससाेबत वेस्निना व मकारावा जोडीचा ५-७, ७-६(७-४), ७-५ने पराभव करत महिला दुहेरीत जेतेपद मिळवले. सानियाचे हे महिला दुहेरीचे पहिले ग्रँडस्लॅम आहे.तिच्या नावे मिश्रची ३ ग्रँडस्लॅम आहेत.

सुमीतही चॅम्पियन
भारताच्या १७ वर्षीय सुमीत नागलने विम्बल्डन ज्युनियर बॉइज दुहेरीचे विजेतेपद पटकावले. त्याने व्हिएतनामच्या हुआंग लायसोबत हा किताब जिंकला. या जोडीने रीली अोपेल्का आणि जपानच्या अकिरा सँतिलान जोडीचा ७-६, ६-४ने पराभव केला.
पुढील स्लाइडमध्ये, लिएंडर पेसचे १६ वे ग्रँडस्लॅम