आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाैरंगाबादचा संजय बांगर टीम इंडियाचा फलंदाजी प्रशिक्षक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अनिल कुंबळे याची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर आता शनिवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने संजय बांगर यांची फलंदाजी कोच म्हणून नियुक्ती केली. अभय शर्मा याची क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली. टीम इंडियाचा मुख्य कोच अनिल कुंबळेसोबत चर्चा करून या दोन्ही नियुक्त्या करण्यात आल्या, असे बीसीसीआयचे सचिव अजय शिर्के यांनी सांगितले. बांगर गेले काही वर्षे फलंदाजी प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. पुढील महिन्यात टीम इंडियाच्या वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी या दोघांची नियुक्ती असल्याचे बीसीसीआयने सांगितले आहे. नुकत्याच झालेल्या टीम इंडियाच्या झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संजय बांगर यांच्याकडे मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी होती. भारताने या दौऱ्यात वनडे मालिका ३-० ने तर टी-२० मालिका २-१ ने जिंकली होती.
बातम्या आणखी आहेत...