आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संकलेचा, माेहसीनचा अाेडिशा संघाला दणका, अाेडिशा ९/३११ संकलेचाने घेतले ४ बळी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वायनाड - जबरदस्त फाॅर्मात असलेल्या अनुपम संकलेचा (४/७५) अाणि माेहसीन सय्यद (३/५८) यांनी रणजी ट्राॅफीमध्ये महाराष्ट्राकडून शानदार गाेलंदाजी केली. त्यामुळे अाेडिशा संघाला मंगळवारी पहिल्या दिवसअखेर ९ गड्यांच्या माेबदल्यात ३११ धावांची खेळी करता अाली. अाेडिशाकडून समंत्रायने सर्वाधिक ८९ धावा काढल्या. त्यामुळे अाेडिशाला धावांचा ३०० चा अाकडा पार करता अाला. याशिवाय दीपक बेहराने (५८) अर्धशतकाचे महत्त्वपूर्ण याेगदान दिले.
नाणेफेक जिंकून महाराष्ट्र संघाने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. कर्णधार स्वप्निल गुगळेचा हा निर्णय अनुपम संकलेचाने याेग्य ठरवला. त्याने पाचव्या षटकाच्या दुसऱ्या व तिसऱ्या चेंडूवर सलग दाेन विकेट घेऊन अाेडिशाला धक्का दिला. त्याने अनुक्रमे पटनाईक (४) व गाेविंद पाेद्दारला (०) बाद केले. त्यानंतर उस्मानाबादच्या माेहसीनने रावतला (१६) पायचीत करून तंबूमध्ये पाठवले. त्यापाठाेपाठ रणजितला (२६) बाद करून संकलेचाने वैयक्तिक तिसरा बळी घेतला. त्यानंतर समंत्रायने संमयी खेळी करताना अर्धशतक ठाेकले. त्याने १९२ चेंडूंत ११ चाैकारांसह ८९, बेहराने ५८ धावांचे याेगदान दिले.

संक्षिप्त धावफलक :
अाेडिशा : पहिला डाव : ९ बाद ३११ धावा (समंत्राय ८९, बेहरा ५८, ४/७५ संकलेचा, ३/५८ माेहसीन).
उस्मानाबादचा माेहसीन चमकला
महाराष्ट्राकडून उस्मानाबादच्या सय्यद माेहसीनने अापली लय कायम ठेवली. त्याने भेदक गाेलंदाजी करताना शानदार तीन बळी घेतले. त्याने १६ षटकांमध्ये ५८ धावा देताना ३ बळी घेतले. तसेच त्रिपाठी व चिराग खुराणाने प्रत्येकी एक गडी बाद केला.
बातम्या आणखी आहेत...