आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंग्लंडची सारा रचणार इतिहास, ऑस्ट्रेलियामध्ये पुरुषांसमवेत खेळणार क्रिकेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न- इंग्लंडच्या महिला क्रिकेट टीमची प्लेयर असलेली 26 वर्षांची सारा टेलर क्रिकेटमध्ये एक आगळा वेगळा विक्रम प्रस्थापित करण्याच्या तयारित आहे. ती जेव्हा शनिवारी मैदानावर उतरेल तेव्हा, पुरुषांच्या ऑस्ट्रेलियन डोमेस्टिक टूर्नामेंटमध्ये खेळाणारी पहिली महिला क्रिकेटर म्हणून तिचा उल्लेख केला जाईल. हो ती शनिवारी पुरुषांच्या ऑस्ट्रेलियन डोमेस्टिक टूर्नामेंटमध्ये खेळाणा आहे.
हे अचिव्हमेंट विशेष का?
इंग्लंड टीमची विकेटकीपर फलंदाज सारा नॉर्दन डिस्ट्रिककडून हा सामना खेळेल. ही लीग 1897 मध्ये सुरू झाली होती. एखाद्या महिला खेळाडूला ही संधी मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. म्हणजेच लीगच्या 118 वर्षांच्या इतिहासात असे पहिल्यांदाच होत आहे की, एखादी महिला पुरुषांच्या क्रिकेट टीममध्ये खेळेल.

कोन आहे सारा?
साराचा जन्म ईस्ट लंडनच्या व्हाइट चॅपलमध्ये झाला आहे. तिचे शिक्षण ब्रिग्टन कॉलेजमध्ये झाले. तीला आयसीसी वुमन्स वन डे इंटरनॅशनल क्रिकेटर ऑफ द ईयर अवॉर्डदेखील मिळाला आहे. 2008 मध्ये तिच्या परफॉर्मंसमुळेच वुमन्स क्रिकेट टिमने अॅशेस जिंकला होता. इंग्लंडसाठी 8 टेस्ट, 98 वन डे आणि 73 टी-20 सामने खेळारी टेलर या खास टीमसाठीही विकेटकीपरच्या भूमिकेत दिसेल.तिला 8 व्या क्रमांकावर बॅटिंगसाठी पाठवण्यात येईल. सारा टेलर म्हणाली की, ती या नवीन चॅलेन्ज साठी नर्व्हसर तर आहेच पण तेव्हढीच एक्सायटेडही आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, साराचे काही फोटोज...