आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वजन कमी करण्यासाठी सर्फराज गेला लंडनला, या 6 खेळाडूंनाही जास्त आहे फॅट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सर्फराज खान - Divya Marathi
सर्फराज खान
स्पोर्ट्स डेस्क- युवा क्रिकेटर सर्फराज खान आपल्या फिटनेसबाबत आता खूपच सीरीयस झाला आहे. यासाठी तो आता इंग्लंडला एक महिन्याचे खडतर प्रशिक्षण घेईल. आक्रमक फलंदाज अशी ओळख असलेल्या सर्फराजला IPL-9 च्या हंगामात सुरुवातीचे काही सामने खेळविल्यानंतर टीममध्ये स्थान देण्यात आले नव्हते. विराटच्या अपेक्षा करणार पूर्ण...
- IPL मध्ये सर्फराज खान हा विराट कोहलीच्या टीम रॉयल चैलेंजर्स बंगळुरु कडून खेळतो.
- IPL च्या 9 व्या हंगामात विराटने सर्फराजला संघातून तो केवळ चांगला क्षेत्ररक्षक नाही म्हणून वगळले होते.
- विराटने म्हटले होते की, "सर्फराज आक्रमक फलंदाज आहे मात्र, त्याचे क्षेत्ररक्षण कमजोर आहे.
- त्याला फिटनेसवर खूप मेहनत करण्याची गरज आहे.
- सर्फराजचे वजन 64 किलो इतके आहे. उंचीच्या प्रमाणात हे वजन जास्त आहे.
- विराटच्या सल्ल्यानंतर सर्फराजने त्यावर काम सुरु केले व फिटनेसकडे लक्ष दिले आहे.
- सर्फराज म्हणाला, ‘बसु सरांनी मला फिटनेस आणि ट्रेनिंग शेड्यूल दिले आहे. मी इंग्लंडमध्ये त्यानुसार फॅट कमी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
- सर्फराजसोबत त्याचा छोटा भाऊ मुशीर पण इंग्लंडला गेला जो जी-फोर्स क्रिकेट अॅकेडमीशी जोडला गेला आहे.
निकनेम मिळाले पांडा
- सर्फराजच्या शरीरयष्टीमुळे त्याला पांडा निकनेम मिळाले आहे.
- IPL मधील मागील हंगामात सहकारी खेळाडू क्रिस गेलने त्याला हे नाव दिले.
- यंदाच्या हंगामातही गेल सर्फराजला त्याच नावे बोलत असे. आपल्याला माहित असेल पांडा हा खूपच आळसी प्राणी आहे.
- सर्फराजसोबतच अनेक क्रिकेटर्सना आपल्या फिटनेसकडे लक्ष देण्याची गरज आहे. हे युवा क्रिकेटर्स IPL-9 मध्ये विविध संघाकडून खेळले आहेत.
पुढे स्लाईड्सद्वारे जानून घ्या, कोणा-कोणाला गरज आहे वजन कमी करण्याची...
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...