मुंबई- आयपीएल-8 पासून प्रसिद्ध झालेला युवा क्रिकेटर सरफराज खानचा छोटा भाऊ मुशीर खान हा एक महिन्यासाठी इंग्लंडल दैऱ्यावर जाणार आहे. मुशीर 10 वर्षांचा असून ऑलराउंडर आहे. तो श्याम भाटिया यांच्या ‘क्रिकेट फॉर केअर’ संस्थेसोबत झालेल्या करारानुसार ऑगस्टमध्ये इंग्लंडला जाणार आहे. येथे दुबईच्या क्रिकेट अॅकॅडमी जी-फोर्सकडून तो खेळेल. लेफ्ट आर्म स्पिनर असलेला मुशीर पहिल्यांदा चरर्चेत आला, जेव्हा त्याने 2014 मध्ये कांगा लीग क्रिकेट टोर्नामेंटमध्ये मुंबई जिमखानासाठी खेळताना 8 सामन्यात 21 विकेट्स घेतल्या होत्या. युवराजसिंह या टोर्नामेंटमध्ये गेस्ट म्हणून गेला होता. तेथे त्याने मुशीरची बरीच स्तुती केली होती. याशिवाय याच वर्षी मुशीरने मुंबईच्या दादर यूनियन माटुंगासाठी खेळताना विरार सेंटरच्या विरूद्ध 14 ओव्हरमध्ये नऊ रन देऊन नऊ विकेट्स मिळवल्या होत्या.
सरफराज आता झाला आहे स्टार
सध्या सरफराजचे स्टार लखलखत आहेत. गावसकर यांच्या कंपनीने सरफराजबरोबर करार केला आहे. या डीलमुळे सरफराज कोट्याधीश झाला आहे. मुंबईचा खेळाडू असलेल्या सरफराजला यूपीच्यावतीने स्थानिक क्रिकेट खेळण्यासाठी साइन करण्यात आले आहे. सरफराजने आईपीएल-8च्या एका सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरुसाठी खेळताना 21 बॉलमध्ये 45 धावांची तडाखेबाज फलंदाजी केली होती. या खेळी नंतर तर, विराट आणि गेलही त्याचे फॅन झाले होते.
टूरवर जाण्यासाठी उत्सूक आहे मुशीर
या टूरमुळे 10 वर्षांच्या मुशीरला इंग्लंडच्या मैदानावर खेळण्याची आणि तेथील परिस्थिती समजून घेण्याची संधी मिळणार आहे. मुशीर म्हणाला, "मी इंग्लंडला आजवर केवळ टीव्हीवरच पाहिले आहे. सध्या तेथे अॅशेज सिरीज सुरू आहे आणि मी तेथे जात आहे. मला अत्यंत आनंद होत आहे की, मी इंग्लंडला जेट विमानाने जाणार आहे. हा माझा पहिला आंतरराष्ट्रीय टूर असेल. मला तेथे ‘लंडन ब्रिज’ बघायला आवडेल. भाऊ सरफराज म्हणाला की, तेथे थंड हवामान असते आणि बॉलही फार स्विंग होतात. तेथे स्पिनर्सला फार कमी फायदा मिळतो. म्हणून मला बेसिक लाइन-लेंथवर गोलंदाजी करावी लागेल."
वडिल नौशाद आहेत आनंदी
मुशीरचे वडिल आणि कोच नौशाद म्हणाले, "असे क्रिकेट दौरे हे कोणत्याही खेळाडूसाठी अत्यंत महत्वाचे आसतात. जर, लहान वयातच अशी संधी मिळाली तर, याहून चांगले काहीच नाही. लॉर्ड्स मैदानावर गोलंदाजी करण्यासाठी मुशीर फार उत्साही आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, मुशीर खानचे काही निवडक फोटोज...