आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sarfraz Ahmed Appointed Captain Of Pakistan T20 Team, Gets Shahid Afridi's Backing

सर्फराज अहेमद पाकचा नवा टी-२० कर्णधार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाहोर - युवा यष्टिरक्षक फलंदाज सर्फराज अहेमदची पाकिस्तानच्या टी-२० संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानचा माजी टी-२० कर्णधार शाहिद आफ्रिदीने राजीनामा दिला होता. सर्फराज आफ्रिदीची जागा घेईल. "सर्फराज अहेमदची पाकिस्तान टी-२० संघाच्या कर्णधारपदी निवड करताना पीसीबीला आनंद होत आहे. सर्फराजची मागच्या वर्षी पाकच्या वनडे आणि टी-२० संघाच्या उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती. आता तो टी-२० मध्ये आफ्रिदीच्या जागी पाकचे नेतृत्व करेल,' असे पाकिस्तान क्रिकेट मंडळाने एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे जाहीर केले.
सर्फराज अहेमद कर्णधारपदासाठी उत्तम पर्याय होता. त्याच्याकडे नैसर्गिकरीत्या नेतृत्वगुण आहेत, असे पीसीबीचे अध्यक्ष शहरयार खान यांनी सांगितले. मी सकाळी सर्फराजला फोनवरून बोललो. त्याला मी कर्णधारपदाबाबत सांगितले. त्याची निवड बिनविरोध आहे. मी त्याला चांगल्या प्रदर्शनासाठी शुभेच्छा देतो, असेही शहरयार यांनी या वेळी नमूद केले. भारतात झालेल्या वर्ल्डकप टी-२० मध्ये सुमार कामगिरीमुळे पाक संघ साखळीतच स्पर्धेबाहेर पडला होता. आफ्रिदीने दोन दिवसांपूर्वी कर्णधारपदाचा राजीनामा दिला. आता कोच वकार युनूस यांनीसुद्धा प्रशिक्षकपद सोडले आहे.