आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संगकाराच्या ड्रीम टीममध्ये तेंडुलकरला स्थान नाही !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलंबो - श्रीलंकेचा माजी कर्णधार संगकाराने ट्विटरवर सर्वकालीन महान खेळाडूंची ड्रीम टीम घोषित केली. संगकाराच्या संघात राहुल द्रविडच्या रूपाने एकमेव भारतीय खेळाडूने स्थान मिळवले. आश्चर्य म्हणजे सचिनला संघात स्थान मिळू शकले नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतक ठोकणारा आणि २०० कसोटी खेळणारा एकमेव क्रिकेटपटू असूनही संगकाराने आपल्या ड्रीम टीममध्ये सचिनला स्थान दिले नाही. अरविंद डिसिल्व्हाला त्याने कर्णधार बनवले.

संगकाराचीड्रीम टीम अशी : राहुलद्रविड (भारत), मॅथ्यू हेडन (ऑस्ट्रेलिया), ब्रायन लारा (वेस्ट इंडीज), रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया), अरविंद डिसिल्वा (कर्णधार, श्रीलंका), जॅक कॅलिस (द. आफ्रिका), गिलख्रिस्ट (ऑस्ट्रेलिया), शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया), मुरलीधरन (श्रीलंका), वसीम अक्रम (पाक), चामिंडा वास (श्रीलंका).
बातम्या आणखी आहेत...