आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसामुळे दुसऱ्या दिवसाचा "खेळ खल्लास', आणखी दोन दिवस पावसाची शक्यता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फातुल्ला - भारतबांगलादेश यांच्यात सुरू असलेल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पावसामुळे एकही चेंडूचा खेळ होऊ शकला नाही. पहिल्या दिवशीसुद्धा पावसामुळे चार तासांचा खेळ होऊ शकला नव्हता. अंधूक प्रकाशामुळे केवळ ५६ षटकांचा खेळ झाला. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने बिनबाद २३९ धावा काढल्या.

अपुऱ्या सुविधा
फातुल्लास्टेडियमवर अपुऱ्या सुविधा असल्याने खेळाडू आणि चाहते चांगलेच निराश झाले. पावसामुळे मैदान आेले असताना मैदान कोरडे करण्यासाठी स्टेडियमवर फक्त एकच सुपरसॉपर उपलब्ध होते. मैदानही कव्हरने पूर्ण झाकलेले नव्हते.