आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीलंकेविरुद्ध अाज दुसरा वनडे, काेहलीला सत्रात सर्वाधिक धावांचा पल्ला गाठण्याची संधी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पल्लेकल - सलामीच्या विजयाने जबरदस्त फाॅर्मात असलेला भारतीय संघ अाता यजमान श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिकेत मजबूत अाघाडी घेण्यासाठी सज्ज अाहे. गुरुवारी पल्लेकलच्या मैदानावर भारत अाणि यजमान श्रीलंका यांच्यात दुसरा वनडे सामना हाेणार अाहे.
 
भारताने सलामीचा सामना जिंकून पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत १-० ने अाघाडी घेतली. अाता याच अाघाडीला मजबूत करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. यासाठी काेहली बिग्रेड उत्सुक अाहे. दुसरीकडे कर्णधार विराट काेहलीला या सामन्यात अापल्या सरस फलंदाजीच्या बळावर विक्रमी कामगिरीला अापल्या नावे करण्याची संधी अाहे.
 
टीम इंडियाने पहिल्या वनडेमध्ये माेठा विजय संपादन केला. विराट काेहली अाणि धवनच्या शानदार खेळीच्या बळावर भारताने ही विजयी सलामी दिली. यामध्ये काेहलीने  नाबाद अर्धशतकाचे याेगदान दिले हाेते.  

या पराभवामुळे पुन्हा एकदा यजमान श्रीलंकेला टीकेला सामाेरे जावे लागले. यातून कसाेटीपाठाेपाठ अाता वनडे मालिका गमावण्याचे सावट यजमानांवर निर्माण झालेले अाहे. सुमार खेळीमुळे यजमानांना सामन्यात धूळ चाखावी लागत अाहे. दिग्गजांच्या अपयशाचा फटका यजमानांना अापल्या घरच्या मैदानावर बसत अाहे.    

डिकवेलावर मदार : यजमानांना अाता सलामी फलंदाज निराेशन डिकवेलाकडून माेठी अाशा अाहे. त्याच्यावर टीमच्या विजयाची मदार असेल. त्याने सलामीच्या सामन्यात  शानदार अर्धशतकी खेळी केली. मात्र,त्याला इतर खेळाडूूंची साथ मिळाली नाही. त्यामुळे या टीमला पराभवाचा सामना करावा लागला.
 
काेहली टाकू शकतो डुप्लेसिस, रुटला मागे
टीम इंडियाचा कर्णधार विराट काेहली अाता दुसऱ्या वनडेत सरस फलंदाजीसाठी उत्सुक अाहे. यातील अव्वल फलंदाजीच्या बळावर त्याला अापल्या नावे एका नव्या कामगिरीची नाेंद करण्याची संधी अाहे. ४६ धावांची खेळी केल्यास विराट काेहली हा यंदाच्या सत्रामध्ये सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज ठरेल. यातून २०१७ च्या वनडे कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा काढणाऱ्याच्या यादीत काेहली हा अव्वल स्थानी असेल. त्याच्या नावे सर्वाधिक ८१५ धावांची नाेंद हाेईल. यासाठी त्याला ४६ धावांची गरज अाहे. सध्या तिसऱ्या स्थानावर असलेल्या काेहलीच्या नावे १४ डावांत ९६.१२ च्या सरासरीने ७६९ धावांची नाेंद अाहे.यामध्ये ४६ धावांची भर घातल्यानंतर काेहली हा अव्वल स्थानी असलेल्या फाफ डुप्लेसिसला (८१४) अाणि ज्याे रुटला (७८५) मागे टाकू शकताे.
 
मलिंगा करणार ३०० विकेट पूर्ण
गाेलंदाजीमध्ये यजमानांचा हुकमी एक्का लसिथ मलिंगाला अापल्या वनडे करिअरमध्ये ३०० विकेटचा पल्ला गाठण्याची संधी अाहे. त्याने अातापर्यंत २९८ विकेट घेतल्या अाहेत. अाता त्याला दाेन बळी घेऊन अापल्या नावे ३०० विकेट पूर्ण करता येईल. याशिवाय टीमला त्याच्यावर चमकदार कामगिरीचा विश्वास अाहे. गत सामन्यातून त्याने अापल्या करिअरमधील २०० वनडे पूर्ण केले अाहेत.
 
संभाव्य संघ
भारत : विराट काेहली (कर्णधार), शिखर धवन, राेहित शर्मा, लाेकेश राहुल, मनीष पांडे, अजिंक्य रहाणे, केदार जाधव, महेंद्र सिंग धाेनी, हार्दिक, अक्षर पटेल, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, बुमराह, भुवनेश्वर, शार्दूल ठाकूर.
 
श्रीलंका : उपुल थरंगा (कर्णधार), अॅग्लाे मॅथ्यूज, निराेशन डिकवेला, दनुष्का गुणथिलका, कुशल मेंडीस, चामरा कपुगेदरा, मिलिंदा सिरीवर्धने, मलिंदा पुष्पकुमारा, संदानकन, तिसरा परेरा,  लसिथ मलिंगा, विश्व फर्नांडाे.
बातम्या आणखी आहेत...