आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्रीलंकेचा तिसऱ्यांदा पहिल्या डावात धुव्वा! भारताच्या दिवसअखेर 1 बाद 11 धावा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- सलामीच्या  चुका सुधारून यजमान टीम इंडियाने अापल्या घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या कसाेटीत सावधरित्या चांगली सुरुवात केली. अार.अश्विन (४/६७), इशांत शर्मा (३/३७) अाणि रवींद्र जडेजाने (३/५६) शानदार गाेलंदाजी करून पाहुण्या श्रीलंका संघाचे धावांचा डाेंगर रचण्याचे मनसुबे उधळून लावले. त्यामुळे श्रीलंकेला २०५ धावांवर अापला पहिला डाव गुंडाळावा लागला. भारताने तिसऱ्यांदा कसाेटीच्या पहिल्या डावात श्रीलंंकेचा २५० वा त्यापेक्षाही कमी धावांत खुर्दा उडवला. 


 करूणारत्ने (५१) अाणि चांदिमलने (५७) संघाचा डाव सावरला. मात्र, इतर फलंदाज सपशेल अपयशी ठरले. त्यानंतर प्रत्युत्तरात टीम इंडियाने शुक्रवारी पहिल्या डावात पहिल्या दिवसअखेर १ बाद ११ धावा काढल्या. लाेकेश राहुलची (७) माेठ्या खेेळीची निराशा झाली. अाता चेतेश्वर पुजारा (२) अाणि मुरली विजय (२) हे दाेघे मैदानावर खेळत अाहेत. 


नाणेफेक जिंकून पाहुण्या श्रीलंका टीमने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र,दुसऱ्या कसाेटीत संघात परतलेल्या इशांत शर्माने श्रीलंकेचा कर्णधार चांदिमलचा हा निर्णय साफ चुकीचा ठरवला. त्याने पाचव्या षटकांत सलामीवीर समरविक्रमाला पुजाराकरवी झेलबाद केले अाणि श्रीलंकेला पहिला जबर धक्का दिला. त्यापाठाेपाठ फिरकीपटू अार. अश्विनने दुसरी विकेट काढली. त्याने थिरीमानेला  पॅव्हेलियनमध्ये पाठवले.


करुणारत्ने, चांदिमलची झुंुज  झटपट हाेत असलेली पडझड थांबवण्यासाठी करुणारत्ने अाणि चांदिमलने कंबर कसली. या दाेघांनी एकाकी झंुज देताना वैयक्तिके अर्धशतकी खेळी केली. यासह त्यांनी टीमच्या धावसंख्येला गती दिली. 

 

ईशांत शर्माच्या तीन विकेट  
पहिला बळी :४.५  षटक - समरविक्रमा (१३)  
दुसरा बळी : ५०.६  षटक : करुणारत्ने (५१)  
तिसरा बळी : ७८.६  षटक -लकमल (१७)  
> रणजी ट्राॅफीमध्ये दिल्लीची विजयी माेहीम फत्ते करून ईशांत शर्मा संघात परतला. महाराष्ट्राविरुद्ध विजयाने अात्मविश्वास द्विगुणित झालेल्या ईशांतने इकडे संघ व्यवस्थापक अाणि कर्णधार काेहलीने दाखवलेला विश्वास पहिल्याच दिवशी सार्थकी लावला.  त्याने पहिल्या दिवशी शानदार तीन विकेट घेतल्या.  

 

 

जडेजाही चमकला 
पहिला बळी : २९.६ षटक- मॅथ्यूज (१०)  
दुसरा बळी : ६०.६  षटक : डिकवेला (२४)  
तिसरा बळी : ७०.४ षटक -परेरा (१५)  
> गत सामन्यातील अपयशातून सावरलेल्या रवींद्र जडेजाने नागपूर कसाेटीचा पहिलाच दिवस गाजवला. त्याने तीन विकेट घेतल्या. त्याने  ५६ धावा देत हे बळी घेतले. त्यामुळे मॅथ्यूज, डिकवेला व परेराला समाधानकारक खेळी करता अाली नाही.

 

अश्विन नागपुरात बहरला  
पहिला बळी : २४.६ षटक - थिरिमाने (९)  
दुसरा बळी : ६५.२  षटक : शनाका (०२)  
तिसरा बळी : ७१.३ षटक -चांदिमल (५७)  
चाैथा बळी : ७९.१  षटक : हेराथ (४)  
> काेलकाता कसाेटीत सपशेल अपयशी ठरलेला फिरकीपटू   अश्विन नागपूरच्या मैदानावर चांगलाच बहरला. त्याने शानदार गाेलंदाजी करताना टीम इंडियाला चार विकेट घेऊन दिल्या. त्याने २८.१ षटकांत ६७ धावा देताना हे यश संपादन केले.   

 

टीममध्ये तीन बदल

नागपूर कसाेटीत विजयाच्या इराद्याने मैदानावर उतरणाऱ्या  भारतीय संघात ३  बदल करण्यात अाले. गाेलंदाज माे. शमीच्या जागी ईशांत शर्मा, भुवनेश्वरच्या जागी राेहित शर्मा व धवनच्या जागी मुरली विजयला संधी देण्यात अाली.

 

चाैघे झालेे पायचीत

श्रीलंकेचे चार फलंदाज पायचीत हाेऊन परतले. यामध्ये सलामीवीर करुणारत्नेसह  मॅथ्यूज, कर्णधार चांदिमल व परेराचा समावेश अाहे. ईशांत व अश्विनने प्रत्येकी एक व रवींद्र जडेजाने पायचीत करून दाेन विकेट मिळवल्या.

 

चाैघे झालेे पायचीत

श्रीलंकेचे चार फलंदाज पायचीत हाेऊन परतले. यामध्ये सलामीवीर करुणारत्नेसह  मॅथ्यूज, कर्णधार चांदिमल व परेराचा समावेश अाहे. ईशांत व अश्विनने प्रत्येकी एक व रवींद्र जडेजाने पायचीत करून दाेन विकेट मिळवल्या.

बातम्या आणखी आहेत...