आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुसरी कसोटी: भारताकडे ३०४ धावांची आघाडी; रहाणेचे शतक !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शतकानंतर हवेत बॅट उंचावून आनंद व्यक्त करताना भारताचा अजिंक्य रहाणे. - Divya Marathi
शतकानंतर हवेत बॅट उंचावून आनंद व्यक्त करताना भारताचा अजिंक्य रहाणे.
किंग्जस्टन - अजिंक्य रहाणेच्या (१०८) नाबाद शतकाच्या बळावर भारताने यजमान वेस्ट इंडीजविरुद्ध दुसऱ्या क्रिकेट सामन्याच्या तिसऱ्या दिवशी चहापानाच्या आधी १७१.१ षटकांत ९ बाद ५०० धावा काढल्या. यानंतर भारताने आपला पहिला डाव घोषित केला. भारताला पहिल्या डावात ३०४ धावांची आघाडी मिळाली आहे. प्रत्युत्तरात विंडीजची चाैथ्या दिवशी दुसऱ्या डावात निराशा झाली. यजमानांना जेवणाच्या ब्रेकपर्यंत ४ बाद ३३ धावा काढता अाल्या. २५६ धावांनी पिछाडीवर असलेल्या विंडीजकडे ६ विकेट शिल्लक अाहेत. शमीने दाेन, मिश्रा व इशांतने प्रत्येकी एक गडी बाद केला.

चहापानानंतर पावसाच्या व्यत्ययामुळे पुन्हा खेळ होऊ शकला नाही. रहाणेने २३७ चेंडूंचा सामना करताना आपल्या शतकी खेळीत १३ चौकार आणि ३ षटकार मारले. भारताने तिसऱ्या दिवसाची सुरुवात ५ बाद ३५८ धावांवरून पुढे केली. त्या वेळी रहाणे ४२ तर वृद्धिमान साहा १७ धावांवर खेळत होते. पदार्पणाचा सामना खेळत असलेल्या कमिन्सच्या चेंडूवर रहाणेने दिवसाचा पहिला चौकार खेचला. यानंतर पुढच्या षटकात त्याला आणखी एक चौकार मारून रहाणेने ९३ चेंडूंत अापले अर्धशतक पूर्ण केले. साहानेसुद्धा कमिन्सच्या चेंडूवर थर्डमॅनकडे चौकार मारला.
भारतीय फलंदाजांनी दुसऱ्या दिवसाच्या तुलनेत तिसऱ्या दिवशी चांगली फलंदाजी केली. पहिल्या तासात भारताने १३ षटकांत ३४ धावा काढल्या. साहाने लेगस्पिनर देवेंद्र बिशूला चौकार मारून १४१ व्या षटकात भारताचा ४०० चा आकडा गाठून दिला. जेवणाच्या ब्रेकच्या आधी अखेरच्या षटकात होल्डरच्या चेंडूवर साहा पायचीत झाला. साहाने १६ चेंेडूंत ५ चौकारांसह ४७ धावा काढल्या. रहाणे व साहा यांनी सहाव्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी केली. जेवणाच्या ब्रेकनंतर चहापानापर्यंत मो. शमी, अमित मिश्रा आणि उमेश यादव यांना रोस्टन चेसने पॅव्हेलियनमध्ये परतवले.

पावसामुळे विंडीजची निराशा
चाैथ्या दिवशी यजमान विंडीज टीमची निराशा झाली.पावसाच्या व्यत्ययामुळे खेळाला उशिरा सुरुवात झाली. खडतर अाव्हानाच्या प्रत्युत्तरात विंडीज टीमला दुसऱ्या डावात चांगली सुरुवात करता अाली नाही. जेवणाच्या ब्रेकपर्यंत विंडीजने ४ बाद ४८ धावांची खेळी केली. सलामीवीर चंद्रिका (१) अाल्यापावलीच तंबूत परतला. त्याला ईशांतने बाद केले. ताे सलग दुसऱ्या डावातही अपयशी ठरला. त्याला समाधानकारक खेळी करता अाली नाही. त्याने पहिल्या डावात अवघ्या ५ धावांचे याेगदान दिले हाेते. त्यापाठाेपाठ सलामीवीर ब्रेथवेट (२३), डॅरेन ब्राव्हाे (२०) अाणि मार्लाेन सॅम्युअल्स (०) झटपट बाद झाले.
पुढे पाहा धावफलक
बातम्या आणखी आहेत...