आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुसरी कसाेटी :चेसने ठाेकले शतक; विंडीजची आघाडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किंग्जस्टन - पावसाच्या व्यत्ययामुळे भारतीय संघाच्या विजयाच्या पाण्याचा अडथळा निर्माण झाला अाहे. पावसामुळे यजमान विंडीज टीमला दुसऱ्या कसाेटीतील पराभव टाळण्याची काहीशी संधी मिळाली अाहे. पाचव्या दिवशी यजमान विंडीज संघाने ८२ षटकांत ६ गड्यांच्या माेबदल्यात ३१३ धावांची खेळी केली. यात ब्लॅकवूड (६३) राेस्टन चेसने (नाबाद ११२) शानदार धावांचे याेगदान दिले.यासह यजमान टीमने ९ धावांची अाघाडी मिळवली. पावसाच्या व्यत्ययामुळे चाैथ्या दिवशी १५.५ षटकांपर्यंतचा खेळ हाेऊ शकला. त्यानंतर पाचव्या दिवशी यजमान टीमसाठी ब्लॅकवूड अाणि चेसने कंबर कसली. त्यांनी संघाचा डाव सावरला.चेसने संयमी खेळी करताना शानदार शतक ठाेकले. याशिवाय त्याने संघाचा डाव सावरला. भारताकडून शमीने दाेन विकेट घेतल्या. तत्पूर्वी भारताने अापला पहिला डाव ५०० धावांवर घाेषित करून विंडीजसमाेर खडतर अाव्हान ठेवले. मात्र, पावसामुळे टीम इंडियाचा झटपट विजय लांबणीवर पडला अाहेे. दुसरीकडे विंडीज टीम अापला पराभव टाळण्यासाठी प्रयत्नशील असेल. या टीमला दुसऱ्या डावात अापली चांगली सुरुवात करता अाली नाही. सलामीवीर चंद्रिका (१) स्वस्तात बाद झाला. त्याला बाद करून ईशांत शर्माने टीम इंडियाकडून विकेटचे खाते उघडले. त्यानंतर क्रेग कार्लाेस (२३), मार्लाेन सॅम्युअल्स (०) यांनाही फार काळ मैदानावर अाव्हान कायम ठेवता अाले नाही. मार्लाेन सॅम्युअल्सची ही शेवटची कसाेटी असल्याची चर्चा अाहे. भारतीय संघाकडून गाेलंदाजीत शमी अाणि अमित मिश्राने दाेन गडी बाद केले. अश्विन, ईशांत शर्मा प्रत्येकी एक बळी घेतला.
बातम्या आणखी आहेत...