आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीलंकेविरोधात सलामीला पाठवून अजिंक्यचा रहाणेचा बळी नकाे : वेंगसरकर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारतीय क्रिकेट संघाच्या फलंदाजीचे श्रीलंकेच्या पहिल्या कसोटीत पानिपत झाल्यानंतर तंत्रशुद्ध फलंदाज अजिंक्य रहाणे याला सलामीवीर बनविण्याचा विचार पुढे येत आहे. ‘टीम इंडिया’च्या संघ व्यवस्थापनाची ही अतिशय घातक चाल आहे. यावर भारताच्या अनेक माजी क्रिकेटपटूंनी प्रतिकूल मत व्यक्त केले आहे.

राष्ट्रीय निवड समितीचे माजी अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांनी, केवळ एका अपयशानंतर अशी घाई करण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. ज्या खेळाडूंना सलामीच्या जागेसाठी निवडण्यात आले आहे, त्यांना पुरेशी संधी तरी द्या, असे मतही वेंगसरकर यांनी व्यक्त केले आहे.

अजिंक्यचे वैयक्तिक प्रशिक्षक प्रवीण अामरे म्हणत होते, "संघाचा विचार केला की गरज पडेल त्या ठिकाणी खेळले पाहिजे. मी अजिंक्यला प्रशिक्षण देताना ही गोष्ट सतत त्याच्या मनावर बिंबवित असतो. मात्र सलामीसाठी तुझा विचार आम्ही करीत नाही, ही गोष्ट राष्ट्रीय निवड समितीने स्पष्ट केल्यानंतर अजिंक्यने चार दिवसांच्या किंवा तत्सम सामन्यात सलामीला खेळणे सोडून दिले आहे. तो फक्त टी-२० व वनडेतच डावाची सुरुवात करतो ही गोष्ट मला येथे स्पष्ट करावीशी वाटते.’

भारताचे माजी कसोटीपटू सुधीर नाईक यांनी सांगितले की, "अजिंक्यमधल्या फळीत स्थैर्य लाभलेला फलंदाज आहे. त्याला सतत क्रम बदलून अस्वस्थ करू नये. उलट सलामीसाठी निवडण्यात आलेल्या के. एल. राहुल यालाच आणखी संधी द्यावी. किंवा पुजाराला आजमावून पाहावे. कारण भारताची आघाडीची फली कोसळली तर मधली फळी सावरणारा अजिंक्यचा अपवाद वगळता अन्य शाश्वत फलंदाज आपल्याकडे नाही.'