आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅच जिंकताच विराट- धोनीची गळाभेट, PHOTOS द्वारे पाहा विजयी टीम इंडियाचा अंदाज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धोनीची गळाभेट घेताना विराट कोहली.... - Divya Marathi
धोनीची गळाभेट घेताना विराट कोहली....
मोहाली- भारताची रनमिशन विराट कोहलीचे शतक (नाबाद 154) आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या (80) खेळीच्या बळावर टीम इंडियाने मोहालीत न्यूझीलंडला 7 विकेटने हरवले. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 49.4 षटकांत सर्वबाद 285 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने 48.2 षटकांत विकेटच्या मोबदल्यात 289 धावा काढून लक्ष्य गाठले. मालिकेतील चौथा सामना धोनीचे शहर रांची येथे 26 ऑक्टोबर रोजी होणार आहे. दरम्यान, भारताने या मालिकेत बरोबरीतून आघाडी घेतली आहे. कोहली-धोनीच्या जबरदस्त खेळीमुळे टीम इंडियाने दिमाखदार विजय मिळवला. या विजय मिळवताच कोहलीने धोनीची गळाभेट घेतली तसेच विजयाच्या एकमेंकांना शुभेच्छा दिल्या. रिलॅक्स दिसला धोनी....
- मोहालीतील तिसरी वनडे जिंकल्यानंतर धोनी रिलॅक्स मूडमध्ये दिसला. मॅच संपल्यानंतर धोनी मैदानात निवांत दिसला.
- दुस-या वनडेत दिल्लीत धोनी बाद झाल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये तो टेन्शनमध्ये फिरताना दिसला होता.
- मात्र, मोहालीतील मॅचचा हिरो राहिलेल्या विराटचे संपूर्ण टीम इंडियाने अभिनंदन केले.
- धोनी-कोहलीने तिस-या विकेटसाठी जबरदस्त अशी 151 धावांची भागीदारी केली.
विराटने सांगितले यशाचे रहस्य-
- कोहलीने मॅचनंतर सांगितले की, मला माहित होते की, किवी गोलंदाज मला लवकर बाद करू इच्छित होते. त्यामुळे मी मॅचच्या गरजेनुसार खेळत होतो. शेवटी फटके मारून स्ट्राईक वाढवला.
- मॅन ऑफ द मॅच ठरलेला कोहली म्हणाला, मला नशिबाने साथ दिली. रॉस टेलरबाबत मला सहानुभूती आहे. कॅच सोडणे कधीच कोणाला आवडत नाही. माझ्याबाबतीतही असे झाले होते.
- मी एकदा वेलिंग्टनमध्ये ब्रेंडन मॅक्युलमचा झेल सोडला होता. त्यानंतर त्याने आम्हाला भरपूर झोडपून मॅच नेली होती.
- मला धोनीची चांगली साथ मिळाली. नंतर मनिषनेही छान साथ दिली.
-धोनी मैदानात येताच त्याने मला आत्मविश्वास दिला. मनिषने आल्या आल्या चांगले फटके मारत माझ्यावरील दबाव कमी केला.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, टीम इंडियाच्या विजयानंतर व त्याआधी कसा होता तेथे अंदाज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...