आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेहवागचे लाराला Funny अंदाजात बर्थडे विश, सोशल मीडियात आल्या या कमेंट्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- वेस्ट इंडिजचा लेजंड क्रिकेटर ब्रायन चार्ल्स लाराने 2 मे रोजी आपला 48th बर्थडे सेलिब्रेट केला. टेस्ट क्रिकेटमध्ये नॉटआउट 400 धावांची सर्वात मोठी खेळी करणा-या लाराला त्याच्या बर्थडे निमित्त ट्विटर किंग वीरेंद्र सेहवागने फनी अंदाजात शुभेच्छा दिल्या. सेहवागने लिहले की, 'हॅप्पी बर्थडे ब्रायन लारा, बीसी लारा...क्या था मारा'. सेहवागच्या या ट्वीटनंतर इंडियन फॅन्सनी सुद्धा फनी कमेंट्स करणे पसंत केले. 2004 साली बनवले होते वर्ल्ड रिकॉर्ड...
 
- लाराने 2004 मध्ये इंग्लंडच्या विरूद्ध अॅंटिगा टेस्टमध्ये 400 धावांची नाबाद खेळी करत टेस्ट क्रिकेटमधील सर्वात मोठी खेळी केली होती.
- या खेळीसोबत त्याने एक अनोखा वर्ल्ड रिकॉर्ड बनवला होता. त्याआधीही त्याच्या नावावर कसोटीत 375 धावांचा विश्व विक्रम होता.
- त्याने 1994 मध्ये वारविकशायरकडून खेळताना डरहम विरूद्ध 501 धावांची नॉटआउट इनिंग खेळताना फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये सर्वात मोठी खेळी करण्याचा रिकॉर्ड बनवले होते.
- आजही दोन्ही विश्वविक्रम त्याच्या नावावर आहेत.
- लाराने आपल्या टेस्ट करियरमध्ये 131 मॅचेसमध्ये 52.88 च्या सरासरीने 11953 धावा ठोकल्या आहेत. यात 34 सेन्चुरी आणि 48 हाफ सेन्चुरीचा समावेश आहे. त्याच्या नावावर टेस्ट क्रिकेटमध्ये दोन ट्रिपल सेन्चुरी आहेत. 
- याशिवाय त्याने 299 वनडे मॅचेमध्ये 40.48 च्या सरासरीने 10405 धावा बनवल्या आहेत. यात 19 सेन्चुरी आणि 63 हाफ सेन्चुरीचा समावेश आहे. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, लाराला Funny बर्थडे विश केल्यानंतर सेहवागच्या पोस्टवर सोशल मीडिया आलेल्या रिएक्शन...
बातम्या आणखी आहेत...