Home »Sports »From The Field» Serena Confirms She Is Pregnant Won Australian Open In Pregnancy

प्रेग्नंट असतानाच सेरेनाने जिंकले ऑस्ट्रेलिया ओपन, येताहेत अशा अशा कमेंट्स

दिव्यमराठी वेब टीम | Apr 20, 2017, 12:20 PM IST

न्यूयॉर्क- 35 वर्षाची अमेरिकन टेनिस स्टार सेरेना विलियम्स सध्या प्रेग्नंट आहे. ऑक्टोबरमध्ये ती आई बनणार आहे. सोशल मीडियात एक फोटो पोस्ट करत तिने लिहले की, '20 आठवडे'. या फोटोत तिने यलो कलरचा स्विम सूट घातला आहे. हे वृत्त मिडियात येताच लोकांनी तिला सोशल मीडियात शुभेच्छा देणे सुरु केले. द वुमन टेनिस असोसिएशनने सुद्धा सेरेनाला ट्वीट करत शुभेच्छा दिल्या आहेत. यानंतर सोशल मिडियात विविध प्रतिक्रिया येत आहेत...
एका फॅनने लिहले की, सेरेना विलियम्सने प्रेग्नंट असतानाच ऑस्ट्रेलियन ओपन जिंकला होता आणि तिच्या बाळाने जन्माला येण्याआधीच असे काही केले आहे ते मी अजून करू शकलो नाही.
डिसेंबर महिन्यात केला होता साखरपुडा-
- डिसेंबर महिन्यातच रेड्डिटचा को-फाउंडर एलेक्सिस ओहानियनसोबत तिने साखरपुडा केला होता. यानंतर हे कपल न्यूझीलंड येथे बीचवर सुट्टी साजरा करताना दिसले होते.
- या वर्षी सेरेनाने विंबल्डनमध्ये आपल्या करियरमध्ये 71 वा सिंगल्‍स किताब जिंकला.
- यात 22 ग्रॅंड स्‍लॅम सिंगल्‍स किताब तिच्या नावावर आहेत. या विक्रमासोबतच तिने टेनिस प्लेयर स्‍टेफी ग्राफच्या विक्रमाची बरोबरी तिने केली आहे.
- तिच्या नावावर 186 आठवड्यापर्यंत ती जगातील नंबर वन खेळाडू राहिली आहे.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, सोशल मिडियात सेरेनाबाबत आलेल्या कमेंट्स...

Next Article

Recommended