आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Serena Williams Holds Off Her Sister Venus, Continuing Bid For Grand Slam

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेरेना जिंकली व्हिनस हरली अन् असे झाले सेलिब्रेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानावर असणार्‍या टेनिसस्टार सेरेना विल्यम्सने मोठी बहिन असलेल्या व्हिनस विल्यमचा पराभव करत अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक घेतली. तिने व्हिनसचा महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभव केला. सर्वांचेच लक्ष असलेल्या या सामन्यात, व्हीनसला पराभूत केल्यावर सेरेनाने आपल्या भावना व्यक्त केल्या ती म्हणाली व्हीनसने मला जोरदार टक्कर दिली. ती माझ्या जीवनातील सर्वाधिक आव्हानात्मक खेळाडू आहे. आपली सर्वात चांगली मैत्रीण आणि टेनिस कोर्टवर तिची विरोधी असताना खेळणे सोपे नसते. हा सामना माझ्यासाठी कठीण होता.

या सामन्यात सेरेनाने व्हिनसला सरळ सेटमध्ये ६-२, १-६, ६-३ ने हरवले. सेरेनाने वर्षभरात फ्रेंच ओपन, मेलबर्न ओपन, विम्बल्डन आणि मियामी ओपनचे जेतेपद पटकवले आहेत. आता तिने यूएस ओपनच्या उपांत्य फेरीतही प्रवेश केला आहे. त्यामुळे ती कॅलेंडर ग्रँडस्लॅमच्या केवळ दोन पावलेच दूर असल्याचे बोलले जात आहे.

आता उपांत्य फेरीत सेरेना विल्यम्सविरुद्ध इटलीच्या रॉबर्टा विन्सी यांच्यात रंगणार आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, सामन्याचा रोमांच आणि दोन्ही बहिणींचा सेलिब्रेशन...