आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Serena Williams Welcomes Her First Child With Reddit Co Founder Fiance Alexis Ohanian

टेनिस स्टार सेरेना विलियम्सने मुलीला दिला जन्म, ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेरेनाने या वर्षी एप्रिलमध्ये स्नॅपचॅटवर स्वीमसूटमध्ये आपला बेबी बम्प शो केला होता. - Divya Marathi
सेरेनाने या वर्षी एप्रिलमध्ये स्नॅपचॅटवर स्वीमसूटमध्ये आपला बेबी बम्प शो केला होता.
स्पोर्ट्स डेस्क- स्टार अमेरिकन टेनिस प्लेयर सेरेना विलियम्स आई बनली आहे. तिने शुक्रवारी फ्लोरिडातील पाम बीच स्थित एका हॉस्पिटलमध्ये मुलीला जन्म दिला. रेडिटचा को-फाउंडर एलेक्सिस ओहानियनपासून तिला ही मुलगी झाली आहे. सेरेना तेथे दाखल झाल्याने सेंट मेरी हॉस्पिटलचा संपूर्ण फ्लोर बंद करण्यात आला होता. बाळंतपणानंतर आई सेरेना व मुलीची प्रकृती उत्तम आहे. जन्मावेळी सेरेनाच्या मुलीचे वजन 6 पौंड 13 ओन्स होते. डिसेंबर महिन्यात झाला होता साखरपुडा...
 
- सेरेनाने मागील वर्षी डिसेंबर महिन्यात आपल्यापेक्षा दोन वर्षे लहान अब्जाधीश उद्योगपती एलेक्सिस ओहानियनसोबत साखरपुडा केला होता. एलेक्सिस सोशल गॅदरिंग कंपनी 'रेडिट'चा को-फाउंडर आहे. 
- साखरपुड्यावेळी सेरेनाने खुलासा केला होता की, ती एलेक्सिससोबत मागील दोन वर्षापासून एक-मेंकाना डेट करत आहे. दोघे प्रायवेट ट्रिपसाठी रोम ला गेले होते. 
- तिने रेडिटवर एक कविता लिहत आपली लव्ह स्टोरी शेयर केली होती. ज्यात सेरेनाने म्हटले होते की, ते पहिल्यांदा एका रेस्टांरंटमध्ये भेटले होते. 
- सेरेनाने लिहले होते की, ‘पहिल्यांदा आम्ही योगायोगाने भेटलो होतो. मात्र, यावेळी असे नव्हते. यावेळी त्याने गुडघ्यावर टेकत त्याने ते 4 शब्द म्हटले आणि मी हो म्हटले.’
- नंतर एलेक्सिसने सेरेनाची ही वाक्ये आपल्या फेसबुक अकाउंटवर शेयर करत लिहले होते की, तिने हो म्हटले.’
- सेरेनाने या वर्षी एप्रिलमध्ये स्नॅपचॅटवर स्वीमसूटमध्ये आपला बेबी बम्प शो करताना आपण 20 आठवड्याचे प्रेग्नंट असल्याचा खुलासा केला होता. 
- मागील महिन्यातच सेरेनाने आपण सप्टेंबरमध्ये मुलीला जन्म दिल्यानंतर जानेवारी 2018 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळणार असल्याचे सांगितले आहे. 
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा ,
बातम्या आणखी आहेत...