आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाॅस्ट्रेलियाविरुद्ध मालिका; ‌उमेश, शमीची निवड; जडेजा, अश्विन बाहेर; 4 वनडेसाठी संघ जाहीर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- येत्या १७ सप्टेंबरपासून अाॅस्ट्रेलियाविरुद्ध भारत यांच्यातील पाच वनडे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात हाेणार अाहे. या मालिकेतील सुरुवातीच्या तीन वनडेसाठी यजमान भारताच्या १५ सदस्यीय संघाची घाेषणा करण्यात अाली. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या रवींद्र जडेजा अाणि अार. अश्विनला विश्रांती देण्यात अाली. तसेच युवा गाेलंदाज शार्दूल ठाकूरचीही संघात निवड करण्यात अाली नाही.  
 
पाहुण्या अाॅस्ट्रेलियन संघाचे भारतामध्ये अागमन झाले अाहे. भारत अाणि अाॅस्ट्रेलिया यांच्यात पाच वनडे सामन्यांची मालिका हाेणार अाहे. यातील सलामीचा वनडे चेन्नईच्या मैदानावर हाेईल. विराट काेहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ या मालिकेमध्ये खेळणार अाहे.  काेहलीच्या नेतृत्वात नुकतीच भारताने श्रीलंका दाैऱ्यामध्ये मालिका विजय संपादन केला अाहे. अाता अापल्या घरच्या मैदानावर अाॅस्ट्रेलियाविरुद्धची मालिका जिंकण्याचा कर्णधार  काेहलीचा मानस अाहे. यासह त्याला अापल्या नावे विक्रमी कामगिरीची नाेंद करता येईल.  
 
‘अाम्ही मालिकेतील सुरुवातीच्या तीन वनडेसाठी संघाची निवड केली. यासाठी अाम्ही अश्विन अाणि जडेजाला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला. श्रीलंका दाैऱ्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या यजुवेंद्र चहल अाणि अक्षर पटेलला संधी देण्यात अाली.  त्यामुळे हा निर्णय घेण्यात अाला,’अशी प्रतिक्रिया  निवड समितीचे अध्यक्ष प्रसाद यांनी दिली.  
 
यादव, शमीकडून अाशा
वेगवान गाेलंदाज उमेश यादव व शमीकडून अाता मालिकेमध्ये माेठ्या अाशा अाहे. ही वेगवान गाेलंदाजांची जाेडी मालिकेत सरस कामगिरी करण्याचा विश्वास निवड समितीने व्यक्त केला.

भारतीय संघ 
विराट काेहली (कर्णधार), राेहित शर्मा, शिखर धवन, लाेकेश राहुल, केदार जाधव, मनीष पांडे, अजिंक्य रहाणे, महेंद्रसिंग धाेनी, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वरकुमार, उमेश यादव, माे. शमी.

उद्या सराव सामना
येत्या रविवारपासून भारत अाणि अाॅस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेला सुरुवात हाेईल.या मालिकेच्या तयारीसाठी एका सराव सामन्याचे अायाेजन करण्यात अाले. मंगळवारी हा सराव सामना चेन्नईच्या मैदानावर हाेणार अाहे. 
बातम्या आणखी आहेत...