आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहिद आफ्रिदीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, आता फ्रीलान्स क्रिकेटर होणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शारजा/कराची - पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहिद आफ्रिदीने वयाच्या 36व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे. 21 वर्षांपासून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत होता. निवृत्तीच्या घोषणेनंतर आफ्रिदी म्हणाला, आता तो फ्रीलान्स क्रिकेटर म्हणून ओळख निर्माण करणार आहे. जगभरातील लीगमध्ये खेळण्याची त्याला इच्छा आहे. 
 
फेब्रुवारीच्या सुरुवातीला दिले होते संकेत 
- शाहिदने कसोटी आणि वनडे क्रिकेटला याआधीच अलविदा केले आहे. 
- 2016 मध्ये भारतात झालेल्या टी-20 वर्ल्ड चँपियनशिपमध्ये आफ्रिदीने पाकिस्तानचे नेतृत्व केले होते. 
- त्याच्या खराब परफॉर्मन्सनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डने त्याला कर्णधार पदावरुन दूर केले होते. मात्र टी-20 फॉर्मेटमध्ये तो खेळत होता. 
- या महिन्याच्या सुरुवातीलाच आफ्रिदीने एक दिवसीय क्रिकेट सामन्यातून निवृत्तीचे संकेत दिले होते. 

398 वनडे 
- आफ्रिदीची क्रिकेट कारकिर्द मोठी राहिली आहे. तो 398 वनडे खेळला. यामध्ये त्याने 8064 रन केले. 
- वनडेमध्ये त्याचा सर्वोच्च स्कोअर 124 धावा आहे. 
 
वनडे मध्ये 395 विकेट 
- 398 वनडे खेळलेल्या आफ्रदिने कारकिर्दीत 395  विकेट मिळविल्या आहेत. 
 
98 टी-20 मॅच
- आफ्रिदीने 98 आंतरराष्ट्रीय टी-20 मॅच खेळल्या. 
- त्यात त्याने 1405 रन केले. तर, 97 विकेट मिळविल्या. 
 
27 कसोटी सामने 
- 27 कसोटी सामने खेळलेल्या आफ्रिदीने 1176 रन झळकावले. यात त्याची सर्वोच्च धावसंख्या 156 होती. तर त्याच्या नावे 48 विकेट आहेत. 
  
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...