आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shahid Afridi & Arshi Khan Not Dating! Clarification Comes Post Pakistani Cricketer’S WhatsApp Chat Went Viral

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंडियन मॉडेलबरोबर आफ्रिदीचे अफेअर, गुपित आले समोर तर अशा आल्या रिअॅक्शनस्

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अर्शी खान आणि शाहिद आफ्रिदी - Divya Marathi
अर्शी खान आणि शाहिद आफ्रिदी
इस्लामाबाद- परत एकदा पाकिस्तानचा क्रिकेटर शाहिद आफ्रिदी माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. शाहिद आफ्रिदी आणि भारतीय मॉडेल अर्शी खान यांच्या अफेअरची जोरदर चर्चा सुरू आहे. आफ्रिदी आणि अर्शी काही दिवसांपूर्वी दुबईच्य एका होटेलमध्ये एंजॉय करताना दिसून आले. दोघेही होटेलमध्ये दोन दिवस सोबत होते. वेबसाइटवर अर्शी खानने स्वतःच मान्य केले होते की तिने आफ्रिदीला किसदेखील केले आहे. मात्र अफेअरवर विचारताच तिने गोलमोल उत्तरे दिली होती. मात्र आता जेव्हा शाहिद आफ्रिदीच या बातमीवर भडकला तर, अर्शीनेही ट्वीट करून अफेअरची बातमी फेटाळली.
मित्रांनी केली पुष्टी
कराची येथील शाहिद आफ्रिदीच्या मित्रांनी हे दोघेही दुबईत सोबत थांबल्याची पुष्टी केली आहे. मिळालेल्य माहिती नुसार अर्शी खान आणि आफ्रिदी फोन आणि मॅसेजच्या माध्यमातून नेहमी संपर्कात राहतात. अर्शी मुळची अफगानी असून, ती 4 वर्षांची असतानाच तिचे कुटुंब अफगानिस्तानमधून भोपाळला आले.
आफ्रिदी भडकला
या वृत्तावर आफ्रिदी प्रचंड भडकला आहे. त्याने यासाठी भारतीय माध्यमे जबाबदर असल्याचे म्हटले. त्याने म्हटले आहे की, भारतीय माध्यमे मला विनाकारणच बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. यमुळेच भारतीय माध्यमांवर पाकिस्तानी चॅनलस् आणि क्रिकेटर्स विश्वास ठेवत नाही. आमच्या अफेअरची बातमी ही खोटी आहे. आफ्रिदीचे लग्न झाले असून, त्याला चार मुलीही आहेत.

ट्वीटः
पहिले ट्वीट : "मी आफ्रिदीला डेट करत नाही. आम्ही चांगले मित्र आहोत. आम्ही मित्राप्रमाणेच भेटतो आणि काही वेळ घालवतो."

दुसरे ट्वीट : "शाहिद, हे माध्यमांमध्ये काय सुरू आहे? मी तर आफ्रिदीची फार मोठी फॅन आहे. मात्र माध्यमे आपल्य अफेअरच्या गोष्टी करत आहे."

पुढील स्लाइड्सवर पाहा, अर्शीचे काही खास फोटो..., सोबतच वाचा काय लिहिले आहे अर्शीने तिच्या ट्वीटवर...