आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षिकेच्या प्रेमात पडला होता आफ्रिदी, मात्र मामाच्या मुलीशीच झाले लग्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानचा क्रिकेटर शाहिद आफ्रिदी आपली पत्नी नादिया व मुलीसमवेत... - Divya Marathi
पाकिस्तानचा क्रिकेटर शाहिद आफ्रिदी आपली पत्नी नादिया व मुलीसमवेत...
स्पोर्ट्स डेस्क- क्रिकेटमधील सर्वात विस्फोटक फलंदाजांपैकी एक असलेला शाहिद आफ्रिदीने टी- 20 क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतली आहे. पाकिस्तानच्या नॅशनल सिलेक्शन कमिटीच्या एका सदस्यानुसार, ‘आफ्रिदीने वेस्ट इंडिजविरूद्ध यूएईत होणा-या टी 20 सीरीजमध्ये फेयरवेल मॅच खेळण्याची मागणी केली आहे.’ आता यावर अंतिम निर्णय पीसीबी चेयरमन यांना घ्यायचा आहे. शिक्षकेसोबत प्रेम, मामाच्या मुलीसमवेत लग्न... अशी आहे इंटरस्टिंग पर्सनल लाईफ...
- सेलिब्रिटी असूनही आफ्रिदीची फॅमिली कधीच लाईमलाईटमध्ये आली नाही.
- त्याने आपल्या मामाच्या मुलीसमवेतच लग्न केले आहे. मात्र हे लग्न आफ्रिदीच्या पित्याच्या इच्छेनुसार झाले होते.
- पर्सनल लाईफ बाबत कमी बोलणा-या आफ्रिदीने एकदा आपल्या लग्नाबाबत एका मुलाखतीत हा खुलासा केला होता.
- त्याने सांगितले होते की, एका दौ-यावर जाण्यापूर्वी मी माझ्या वडिलांना मला मुलगी पाहण्यास सांगितले आहे.
- मी त्यांना ही बाब चेष्टेने म्हटली मात्र त्यांनी ती सीरियसली घेतली. मी जेव्हा दौ-यातून परतलो तेव्हा त्यांनी मला सांगितले की तुझी मंगनी झाली आहे.
- मी हैरान झालो होतो पण करणार काय? मी सुद्धा त्यांचे अभिनंदन केले.
- शाहिदची होणारी बायको दुसरी तिसरी कोणी नव्हती तर त्याच्या मामाची मुलगी नादिया होती.
लग्नाच्या आधीच्या मॅचमध्येही चमकला-
- आफ्रिदी- नादियाचे लग्न 22 ऑक्टोबर, 2000 मध्ये झाले. तेव्हा इंग्लंडविरूध्द मालिका सुरु होती.
- लग्नानंतरच्या पहिल्याच मॅचमध्ये आफ्रिदीने चमकदार कामगिरी केली होती.
- लाहौरमध्ये खेळलेल्या या मॅचमध्ये त्याने अर्धशतकासह 5 विकेट घेऊन मॅन ऑफ द मॅच बनला.
शिक्षकेवर जडले होते प्रेम-
- आफ्रिदीने एकदा लहानपणीचा किस्सा शेयर करताना त्याच्या पहिल्या प्रेमाबाबत सांगितले होते.
- त्याच्या म्हणण्यानुसार, ‘स्कूलमध्ये शालेय शिक्षण घेत असताना तो पहिल्यांदा प्रेमात पडला होता. ती दुसरी तिरी कोणी नव्हती तर त्याचीच शिक्षिका होती.
- ‘ते लहानपणीचे आकर्षण होते. मी 9 वर्षाचा होता. मला माझी शिक्षिका आवडायची. ती खूपच सुंदर होती.'
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, शाहिद आफ्रिदीचे पत्नी आणि मुलीसमवेतचे फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...