आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आफ्रिदीचे असे 15 PHOTOS, जे चाहत्यांनी कदाचित कधीच पाहिलेच नसतील

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ड्रेसिंग रूममधून टॉवेलवर बाहेर येताना आफ्रिदी... - Divya Marathi
ड्रेसिंग रूममधून टॉवेलवर बाहेर येताना आफ्रिदी...
स्पोर्ट्स डेस्क- पाकिस्तानचा अष्टपैलू शाहीद आफ्रिदीने अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. शारजामध्ये सुरू असलेल्या पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) टी-20 लीग दरम्यान त्याने ‘रिटायरमेंट’ची घोषणा केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय मी घेतला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला तरी चाहत्यांच्या प्रेमाखातर आतासह पुढील दोन वर्षे पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळेन, असे आफ्रिदीने म्हटले. 
 
वन डे, कसोटीतून यापूर्वीच निवृत्त झालाय-
 
-निवृत्तीची घोषणा करताना शाहिद म्हणाला, पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करताना मी सांघिक कामगिरी उंचावण्याला प्राधान्य दिले. - क्रिकेटमधील निवृत्तीनंतर मी फाऊंडेशनच्या कामामध्ये लक्ष घालणार आहे. हे फाऊंडेशन मला अधिक महत्त्वाचे आहे, असे आफ्रिदी म्हणाला. 
- स्वत:च्या फाऊंडेशनकडे अधिक लक्ष देणार असल्याचे त्याने यावेळी सांगितले.
- पाकिस्तान सुपर लीगमध्ये पेशावर झल्मी संघातर्फे आफ्रिदी खेळतोय. 
- निवृत्तीपूर्वीच्या लढतीत त्याने २८ चेंडूंत ५४ धावांची खेळी केली. 
- २०१० मध्ये कसोटी आणि २०१५ वर्ल्डकपनंतर वनडेतून पायउतार होणा-या आफ्रिदीने गेल्या वर्षी भारतात झालेल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचे कर्णधारपद भूषवले होते.
 
शाहिदच्या नावावर १८ वर्षे होता जागतिक विक्रम-
 
- ‘बूम बूम’ या टोपणनावाने प्रसिद्ध असलेल्या आफ्रिदीने १९९६ मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या वनडेत ३७ धावांत शतकी खेळी करत ‘वर्ल्ड रेकॉर्ड’ केला. 
- त्याचा जागतिक विक्रम तब्बल १८ वर्षे कायम होता. 
- २०१४मध्ये न्यूझीलंडच्या कोरी अँडरसनने वेस्ट इंडिजविरुद्ध ३६ चेंडूंमध्ये शतक ठोकत आफ्रिदीच्या रेकॉर्डवर मात केली. 
- अर्थात हा विक्रम आता अँडरसनच्या नावावरही नाही. 
- २०१५ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध जोहान्सबर्ग वनडेत दक्षिण आफ्रिकेच्या एबी डेविलियर्सला शतकासाठी केवळ ३१ चेंडू पुरेसे ठरले.
 
आफ्रिदीची २१ वर्षाची कारकिर्द-
 
- अष्टपैलू आफ्रिदीने २१ वर्षाच्या कारकीर्दीत ३९८ वनडे सामन्यांत ८०६४ धावा केल्या. तसेच प्रभावी लेगस्पिनने तब्बल ३९५ विकेट घेतल्यात. 
- मात्र त्याच्या वाट्याला केवळ २७ कसोटी सामने आले. त्यात ११७६ धावा केल्यात. तसेच ४८ विकेट घेतल्यात. 
- ९८ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांत १४०५ धावा आणि ९७ विकेट आफ्रिदीच्या नावावर आहेत. 
- मैदानावर आक्रमक पवित्रा घेणा-या आफ्रिदीकडून एक घोडचूकही झाली. 
- २०१०मधील ऑस्ट्रेलिया दौ-यात पर्थ वनडेत चेंडू कुरतडल्याप्रकरणी त्याच्यावर दोन टी-२० सामन्यांची बंदी घालण्यात आली होती.
 
पुढे स्लाईडद्नारे पाहा, शाहिद आफ्रिदीचे UNSEEN PHOTOS....
बातम्या आणखी आहेत...