आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शमी, कैफ ते पठाणपर्यंत, मुस्लिम असल्याने हे खेळाडू ठरले टीकेचे धनी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इरफान पठाणने पत्नीसोबतचा फोटो शेयर केल्यानंतर अनेकांनी त्याला मुस्लिम धर्माचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे. - Divya Marathi
इरफान पठाणने पत्नीसोबतचा फोटो शेयर केल्यानंतर अनेकांनी त्याला मुस्लिम धर्माचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे.
स्पोर्ट्स डेस्क- टीम इंडियाचा क्रिकेटर इरफान पठाणने नुकताच आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो शेयर केल्याने वादात अडकला. पठाणने पत्नी सफासोबतचा एक फोटो शेयर केला. ज्यात तिच्या हातावर मेहंती आणि नखावर नेल पॉलिश दिसले. ज्यानंतर त्याला सोशल मीडियातून धर्माची आठवण करून देत फटकारले. काय वावगे आहे या फोटोत...
 
- या फोटोत त्याची पत्नी सफा बुर्का आणि हिजाबमध्ये तर दिसत आहे मात्र तिचा चेहरा उघडा आहे. ज्यात सफाने आपल्या दोन्ही हाताच्या बोटांनी चेहरा झाकला आहे. फोटोत केवळ तिचे डोळे आणि हात दिसत आहेत. 
- कट्टरवादी लोकांना तिचे मोकळे हात आणि बोटांवर लावलेले नेल पॉलिश ठीक वाटले नाही. ज्यानंतर त्यांनी पठाणला धार्मिक सल्ला देणे सुरु केले. घरातील महिलेचा फोटो असा शेयर करत नाहीत असेही सुनावले.
- या यूजर्सचे म्हणणे आहे की, हे सर्व आपल्या धर्मात चुकीचे मानले जाते. तर काहींनी इरफानला पाठिंबा देताना सल्ला देणा-यांची भरपूर खेचली आहे.
- इरफान पठानला या गोष्टीचा आधीच अंदाज होता त्यामुळेच त्याने फोटोला कॅप्शन देताना लिहले की, 'कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना बट ऑलवेज #लव #ट्रेवल'.
- इरफान पठाणच्या पत्नीचे नाव सफा बेग आहे, जी एक मॉडेल राहिली आहे. या दोघांचे लग्न फेब्रुवारी 2016 मध्ये झाले होते. या कपलला आता एक मुलगा आहे.
 
अनेक मुस्लिम प्लेयर्स झालेत ट्रोल-
 
- इरफान पठाण असा एकटा मुस्लिम प्लेयर नाही ज्याला मुस्लिम असल्या कारणाने आपल्याच धर्मातील लोकांचा सल्ले ऐकावे लागले. याआधीही अनेक भारतीय मुस्लिम खेळाडूंना अशा टीकेचे धनी व्हावे लागले आहे.
- आजच्या वृत्तात आम्ही अशा मुस्लिम प्लेयर्सबाबत सांगणार आहोत ज्यांना कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या कारणावरून आपल्याच धर्मातील लोकांनी फटकारले आहे किंवा त्यांचा विरोध केला आहे. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, जेव्हा मुस्लिम असल्याने आपल्याच धर्मातील लोकांकडून टीकेचे धनी झालेले भारतीय खेळाडू.....
बातम्या आणखी आहेत...