आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shashank Manoha And Shaharayar Khan May Be Meet In Dubai

मनोहर-शहरयार यांची दुबईत भेट अपेक्षित! मालिका अायाेजनाचा अडसर दूर करण्याची संधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट पुन्हा सुरू होण्याच्या मार्गातील अडथळा दूर होण्याच्या दृष्टीने आणखी एक संधी उपलब्ध झाली आहे. श्रीनिवासन यांच्या जागी नियुक्त करण्यात आलेले, आयसीसी चेअरमन व बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर दुबई येथील आयसीसीसी मुख्यालयात कामकाज पाहण्यासाठी जाणार आहेत. चार दिवसांच्या या दौऱ्यात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन शहरयार खान यांची आणि मनोहर यांची भेट होण्याची शक्यता आहे. आम्ही ‘युएई’त कोणत्याही परिस्थितीत खेळणार नाही. त्यामुळे तेथे खेळण्यासाठी सरकारकडे परवानगी मागण्याचा प्रश्नच नाही, असेही मनोहर यांनी स्पष्ट केले होते.

बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर म्हणाले, मालिका तरच शक्य आहे, जर पाकिस्तान संघ भारतात येण्यासाठी राजी असेल.मनोहर यांनी २०१४मध्ये आयपीएलचा पहिला टप्पा दुबईत खेळविण्यात आल्याबद्दलही जाहीर नाराजी व्यक्त केली होती.