आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shashank Manohar To Step Down As BCCI President For ICC Chairmanship

मनोहर सोडतील BCCI अध्यक्षपद, एक मराठी नेता घेऊ शकतो जागा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगमोहन दालमिया यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बीसीसीआय अध्यक्षपदी ऑक्टोबर 2015 मध्ये मनोहर यांची निवड झाली होती. - Divya Marathi
जगमोहन दालमिया यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बीसीसीआय अध्यक्षपदी ऑक्टोबर 2015 मध्ये मनोहर यांची निवड झाली होती.
मुंबई - शशांक मनोहर लवकरच BCCI अध्यक्षपद सोडण्याची शक्यता आहे. त्यामागे दोन शक्यता आहेत. एक - ICC अध्यक्षपदासाठी मे मध्ये निवडणूक आहे, त्यात मनोहर सर्वात आघाडीवर आहेत. दुसरे कारण आहे, की बीसीसीआयवर जस्टिस लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याचा दबाव आहे. त्यानुसार एकच व्यक्ती दोन पदांवर राहू शकत नाही. मनोहर यांनी पद सोडल्यानंतर बीसीसीआय 16 महिन्यात तिसरा अध्यक्ष निवडेल.
मनोहरांनी पद सोडल्यानंतर कोण होणार अध्यक्ष...
- मनोहरांनी बीसीसीआय अध्यक्षपद सोडल्यानंतर त्यांच्या जागी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार येण्याची दाट शक्यता आहे.
- पवार मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत.
- याआधी 2005 ते 2008 दरम्यान ते बीसीसीआयचे अध्यक्ष होते.
- त्यानंतर 2010 ते 2012 दरम्यान आयसीसी अध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती.
- जगमोहन दालमियांच्या निधनानंतरही शरद पवारांचे नाव चर्चेत होते.

मनोहर केव्हा झाले बीसीसीआय अध्यक्ष
- मिस्टर क्लिन अशी प्रतिमा असलेले मनोहर याआधी 2008 ते 2011 दरम्यान बीसीसीआयचे अध्यक्ष होते.
- विधिज्ञ आणि कुशल प्रशासक म्हटले जाणारे मनोहर यांची पुन्हा ऑक्टोबर 2015 मध्ये जगमोहन दालमिया यांच्या निधनानंतर अध्यक्षपदी वर्णी लागली. केवळ अर्ध्या तासाच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.
- काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयने डिस्कव्हरी चॅनलमधील राहुल जौहरी यांना सीईओ नियुक्त केले आहे. बीसीसीआयने बाहेरच्या एखाद्या व्यक्तीला एवढी मोठी जबाबदारी देण्याची ही पहिलीच वेळ आहे.

श्रीनिवसन यांना केला कडवा विरोध
- 2015-16 बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत मनोहरांनी चेन्नईचे उद्योगपती एन. श्रीनिवासन यांच्याविरोधात मोर्चा उघडला होता.
- श्रीनिवासन तेव्हा बीसीसीआय आणि आयसीसी या दोन्हींचे प्रमुख होते आणि आयपीएल स्पॉट फिक्सिंग वाद चव्हाट्यावर आला होता.
- बीसीसीआय अध्यक्ष झाल्यानंतर मनोहरांनी बोर्डाची इमेज सुधारण्याची मोठी जबाबदारी स्विकारली.
- ते म्हणाले होते, अध्यक्षपदाचा कालावधी दोन वर्षांचा आहे, मात्र जो बदल करायची गरज आहे तो दोन महिन्यात होईल.
मनोहरांना स्वतः तयार केलेल्या नियमांचा बसणार फटका
- जर मनोहर मे मध्ये आयसीसीच्या निवडणुकीत उमेदवार झाले तर त्यांना बीसीसीआयचे अध्यक्षपद सोडावे लागेल.
- त्याचे कारण म्हणजे, ते बीसीसीआयचे अध्यक्ष झाल्यानंतर नियम केला गेला होता, की एक व्यक्ती एकावेळी एकच पद भुषवू शकेल. अर्थात बीसीसीआय आणि आयसीसी या दोन्हींचा प्रमुख होऊ शकणार नाही.
- मनोहर यांनी स्वतः नोव्हेंबर 2015 मध्ये आयसीसीमध्ये एन श्रीनिवासन यांना रिप्लेस केले होते.
बीसीसीआयवर का वाढला दबाव
- बीसीसीआयवर आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरण समोर आल्यानंतर सुप्रीम कोर्टाने जस्टिल लोढा समिती स्थापन करुन त्यांच्या शिफारशी अंमलात आणण्यासाठी दबाव आणला.
- सध्या या शिफारशींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल आहे.
- अनेक संघटनांना भीती आहे, की समितीच्या शिफारशींनी त्यांचा दबदबा संपूष्टात येईल.
- त्याचे मुख्य कारण म्हणजे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे, की बीसीसीआयमध्ये वन स्टेट-वन व्होट पॉलिसी असेल.
- अर्थात महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये भलेही तीन-तीन संघटना असतील, बीसीसीआय निवडणुकीत त्यांना एकाच मताचा अधिकार असेल.
- अनेक संघटनांनी याविरोधात सुप्रीम कोर्टात अपील केले आहे.
पुढील स्लाइडमध्ये,
काय आहे लोढा समितीच्या शिफारशी