स्पोर्ट्स डेस्क- दिल्लीत सध्या प्रो-रेसलिंग लीगचा दुसरा सीजन खेळला जात आहे. ज्यात एका विदेशी रेसलरने आमिर खानची फिल्म 'दंगल' रिलीज झाल्यानंतर खूपच लोकप्रिय झालेली फिमेल रेसलर बबिता फोगाटला केवळ 46 सेकंदात हरवले. 'दंगल गर्ल' बबिताला हारवणारी ही रेसलर स्वीडनची असून, सोफिया मॅटसन असे तिचे नाव आहे. रेसलिंग वर्ल्डमध्ये सोफियाला ग्लॅमर गर्ल म्हणून ओळखले जाते. मात्र, तिला हे दिलेले नाव अजिबात पसंत नाही. रिओत जिंकले होते ब्राँझ मेडल...
- रेसलिंग लीगमध्ये यूपी दंगलच्या बबिता फोगाटला हरियाणा हॅमर्सची रेसलर सोफिया मॅटसनने केवळ 46 सेकंदात हरविले.
- सोफियाने ही मॅच 4-0 अशी जिंकली. या मॅचनंतर दुखापतीच्या कारणाने बबिता टूर्नामेंटमधून बाहेर पडली आहे.
- सोफिया मॅटसन स्वीडनची रेसलर आहे, जिने खूपच कमी वयात रेसलिंग खेळणे सुरु केले होते.
- स्वीडिश गर्ल सोफिया मॅटसनला रेसलिंग जगात ग्लॅमर गर्ल सोबतच तांत्रिक दृष् सर्वात परफेक्ट रेसलर मानले जाते.
- इंटरनॅशनल टूर्नामेंटमध्ये सोफियाने अनेकदा गोल्ड मेडल जिंकली आहेत. यूरोपियन चॅम्पियनशिपमध्ये तिने चार वेळा आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये एकदा गोल्ड मेडल जिंकले आहे.
- याशिवाय गेल्या वर्षी झालेल्या रिओ ऑलिंपिकमध्ये तिने 53 किलोग्रॅम कॅटेगरीत ब्राँझ मेडल जिंकले होते.
- प्रो-रेसलिंग लीगमधील दुस-या सीजनमध्ये हरियाणाच्या हॅमर्स टीमने सोफियाला 41.50 लाख रुपयांना खरेदी केले आहे.
ब्यूटी टायटल नाकारलाय सोफियाने-
- 2012 मध्ये बेलग्रेडमध्ये झालेल्या यूरोपियन रेसलिंग चॅम्पियनशिप दरम्यान टूर्नामेंटच्या ऑर्गनायजर्सनी तिचे सौंदर्य पाहून तिला 'मिस यूरोप' टायटल देण्याचे जाहीर केले.
- मात्र, सोफियाने हे टायटल घेण्यास नकार दिला. सोफियाने त्यावेळी म्हटले होते की, 'हे टायटल काही खेळाचा भाग नाही. मी येथे रेसलिंग करण्यासाठी आणि जिंकण्यासाठी आली आहे. ही जागा दुस-या कामासाठी वापरता कामा नये.'
- 27 वर्षाच्या सोफियाचे स्पष्टपणे म्हणणे आहे की, फिमेल रेसलिंगला सुद्धा आता गंभीरतेने घेतले पाहिजे.
- तिच्या देशात रेसलिंग खूपच फेमस आहे आणि स्वीडनची ओळख एक जगातील टॉप रेसलिंग देशांपैकी एक आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे फोटोजमधून पाहा, सोफियाला का म्हटले जाते ग्लॅमर गर्ल...