आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ...And Shivasena Pramukh Balasaheb Thakare Sayed \'zaheer Khan Is A Sachha Muslim\'

तेव्हा खुद्द बाळासाहेबही म्हणाले होते- जहीर \'सच्चा\' हिंदुस्तानी मुसलमान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जहीर खानने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याने भारतीय क्रिकेटला फार मोठे योगदान दिले आहे. त्याचे हे योगदान आणि 2011 सालच्या विश्वचशकातील त्याची 'लाजववाब कामगिरी' सर्वांच्याच चीर काळ स्मरणात राहिल. जहीर एक असा क्रिकेटर आहे, ज्याचे कौतुक खुद्द शिवसेना प्रमुख बाळासाहेव ठाकरे यांनी 'जहीर खान एक सच्चा हिंदुस्तानी मुसलमान आहे.' या शब्दांत केली होती.

महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यात असलेल्या श्रीरामपूरमध्ये जन्मलेला जहीर त्याच्या भेदक गोलंदाजीमुळे कायमचाच तमाम भारतीयांच्या स्मरणात राहील. त्याच्या अनेक खेळी तर आरजही डोळ्या समोर जशाच्या तशा उभ्या राहतात.
जहीरला त्याच्या लाजवाब खेळीमुळे तमाम भारतीय क्रिकेट प्रेमिंनी अक्षरशहा डोक्यावर घेतले. एवढेच काय, पण अनेक दिग्गजांनी त्याचे तोंडभरून कौतुकही केले. मात्र खुद्द दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलेले त्याचे कौतुक काही औरच. ज्याची, आजही सर्वत्र चर्चा होताना दिसते.
पुढील स्लाइड्सवर वाचा, का झाले शिवसेनाप्रमुख झहीरवर फिदा...आणखी काय म्हणाले होते....