आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shoaib Akhtar On Virat Kohli, T20 WC India Pakistan Match Reactions And Comments

#IndvsPak: रावळपिंडी एक्स्प्रेस शोऐब म्हणाला, \'व्वा विराट, तुझ्यासारखा तूच!\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता- ईडन गार्डन्सवर झालेल्या हायव्होल्टेज सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानला धूळ चारत मोठा मोठा विजय म‍िळवला. विराट कोहलीच्या जादूपुढे पाकिस्तानच्या गोलंदाज गार पडले. विराट कोहली या विजयाचा हीरो ठरला. रावळपिंडी एक्स्प्रेसनावाने प्रसिद्ध असलेला पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोऐब अख्तरने देखील विराट कोहलीची प्रशंसा केली. 'व्वा विराट. विराट तो विराटच. कोहली सारखा फलंदाज मी आतापर्यंत पाहिला नाही.', अशा शब्दात शोऐब अख्तरचे आपली प्रतिक्रिया दिली.

विराट कोहलीने 37 चेंडूत नाबात 55 धावा ठोकून टीम इंडियाला विजय मिळवूून दिला. 'मॅन ऑफ द मॅच' म्हणून त्याला गौरवण्यात आले. नुकत्याच झालेल्या आशिया चषकातही पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विजयी खेळी केली होती. त्यावेळी कोहलीने टीम इंडियाला मोठ्या अडचणीतून बाहेर काढले होते.

शोऐब अख्तर म्हणाला, 'टॅलेंट तर बहुतेक लोकांकडे असतो. मात्र, आणीबाणीच्या काळात स्वत:ची सामना करून जो संघाला विजय मिळवून देतो, त्यालाच विराट कोहली असे म्हणतात.'

विराट सारखा फिनिशर पाहिला नाही...
- एका टीव्ही चॅनलशी शोएबने संवाद साधला. तो म्हणाला, 'क्रिकेट म्हटले की, अनेक क्रिकेटपटूंवर चर्चा केली जाते. आज मात्र, केवळ विराट कोहलीचा दिवस आहे. 20-22 वर्षांच्या कारकिर्दमध्ये विराट सारखा फलंदाज व त्याच्यासारखा फिनिशर पाहिला नाही'


पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, टीम इंडियाच्या विजयाचा जल्लोष साजरा करताना अमिताभ, सचिन तेंडुलकर व मुकेश अंबानी यांची फॅमिली....