आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shoaib Suggested Younis Khan To Quit International Cricket

यूनुसने आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमधून निवृत्‍ती घ्‍यावी- अख्‍तर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्‍तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्‍तर याने फलंदाज यूनुस खानला आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमधून निवृत्‍त होण्‍याचा सल्‍ला दिला आहे. जगात सर्वाधिक वेगवान गोलंदाजीचा विक्रम असलेल्‍या अख्‍तरने म्‍हटले आहे की, '37 वर्षीय फलंदाज यूनुसने आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमधून निवृत्‍ती घ्‍यावी. त्‍याला जर वाटत असेल की, आपल्‍यातील क्रिकेट शिल्‍लक आहे, तर सहा महिने त्‍याने खेळण्‍याचा विचार करावा.' अख्‍तरच्‍या या विधानावर विविध प्रतिक्रीया उमटत आहेत.
याआधी वसीम अकरम यानेही यूनुसला एकदिवसीय क्रिकेट सोडण्‍याचा सल्‍ला दिला होता. 'अनुभवी खेळाडूने कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करायला हवे.' असे त्‍याचे मत होते.